त्वचारोग वाढता गंभीर आजार





त्वचा रोग वाढता गंभीर आजार आहे, अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. श्वेता भोनकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे... शेकडो वर्षापूर्वी त्वचेचे आजार होते. यात खाज, खरूज, खुजली, नायटा, गजकरण, चटटे असणे असे विविध त्वचेचे आजार मानवाला सतावत होते. कालांतराने हे आजार मागे पडले. आजचा समाज सौंर्दयीकरणाच्या मायाजाळात मोठ्या प्रमाणात अडकला जात आहे. त्यामुळे या आजाराला अनन्य महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि मानव सौंर्दयीकरणाच्या मोहात फसत चालला असून त्वचा ही नाजूक आहे. या नाजूक त्वचेला शरीरातील विविध आजाराप्रमाणेच त्याचीही योग्य काळजी व निगा राखली पाहिजे. बाजारात आलेली देशी, विदेशी सौंदर्य प्रसादने व त्वचेवरील तात्काळ दुरुस्ती करणारी औषधे ग्राहक व रुग्णांनी घेणे टाळली पाहिजेत. त्वचारोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वचा रोगासारखा गंभीर आजारावर योग्य उपचार झाल्यास त्वचा रोग नाहीसा होतो.



असे स्पष्टीकरण माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या त्वचा रोग तज्ञ डॉ. श्वेता भोनकर यांनी प्रसार वाढते त्वचेचे गंभीर आजारावर बोलताना महिती दिली.



माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या त्वचा रोग तज्ञ डॉ. श्वेता भोनकर यांची प्रसार माध्यमांनी भेट घेतली असता त्वचेच्या वाढत्या आजाराबाबत नागरिक व रुग्णांनी घ्यावयाची काळजी व उपचार पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मानवाला इतर काहीनाकाही आजार असतात. त्याची रुग्ण योग्य उपचार करून काळजी घेतात. मात्र त्वचा रोगाकडे नागरिक गांभीर्याने पाहत नाहीत किंबहूना त्वचेच्या तज्ञ डॉक्टरांकडे जावून खात्रीशीर उपचार घेत नाहीत त्यामुळे त्वचा रोगासारखे आजार दिवसेंदिवस बळावत आहेत. पावसाळा व हिवाळा या ऋतूत त्वचारोगासारखे आजार अधिक बळावतात. सततच्या पर्यावरणाच्या बदलामुळे दमट हवेत त्वचा रुग्ण जास्त आढळतात. लहान मुला मुलींमध्ये हे आजार जास्त आढळतात. त्वचा आजार हा संसर्गजन्य असल्याने अशा रुग्णांनी घ्यावयाची काळजी व उपचार याबात विस्तृत माहिती दिली. मानव हा सौंर्दयीकरणाच्या मागे असल्याने या सुंदर त्वचेचे विपीकरण होत आहे. ही समस्या भेडसावत आहे. हे वास्तव असल्याचेही त्या डॉ. भोनकर म्हणाल्या.


थोडे नवीन जरा जुने