महिला दिना निमित्त लेख.





सर्पमित्र श्रावणी वानखेडे.


सर्पमित्र श्रावणी वानखेडे ही विंधने तालुका उरण 
जिल्हा रायगड येथील रहिवाशी असून गेल्या 2 वर्षा पासून केअर ऑफ नेचर या पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी संस्थे मध्ये कार्यरत आहे.श्रावणी वानखेडे या निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी आहेत. निसर्गातील प्राणी पशु पक्षी यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.सापांना पकडून त्यांना त्यांच्या मूळ आदिवासात मुक्त करण्याचे धाडसी काम श्रावणी करत आहे. एक स्त्री असून देखील ती हे काम न घाबरता निस्वार्थी वृत्तीने करत आहे.



तरी काही लोक बोलतात मुली हे करू शकणार नाही ते करू शकणार नाही पण ह्या मुलीने जगाला दाखून दिले की मुली पण कमी नाहि. कॉल आल्यावर जेवता ताटावरून निघून जाणारी ही निसर्ग प्रेमी श्रावणी साप पकडायला जाते तेंव्हा साप विषारी आहे की बिन विषारी आहे याचा अजिबात विचार करत नाही.कोणताही विचार न करता ती सर्प पकडायला जाते.तर आत्ता पर्यंत तिने 69 सापाला त्यांच्या मूळ आदिवासात मुक्त केले आहे.त्यात काही विषारी सापे सुद्धा होती.तर काही बिन विषारी पण होती.महीलांसाठी खूप मोलाची गोष्ट आहे की एक मुलगी अस काम करत आहे. पुरुष या क्षेत्रात कार्यरत आहेत पण महिला सुद्धा या क्षेत्रात मागे नाहीत हे श्रावणी वानखेडे यांनी दाखवून दिले आहे.


थोडे नवीन जरा जुने