महिला दिना निमित्त लेख.






समाजसेवी व्यक्तिमत्व राजश्री मुंबईकर.


असं म्हणतात कीं प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात अनेक भूमिका निभावत असतो ! पण काही व्यक्तीमत्व अशी असतात की त्यांना काही विशेष उपजत कला गुण अवगत असतात त्यातलंच एक नावं एक अष्टपैलू व्यक्तिमत म्हणजेच सौ.राजश्री राजेंद्र मुंबईकर उरण - गावठाण येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक आदर्श शिक्षिका म्हणून कार्यरत असून उरण,पनवेल,कर्जत शिक्षक पतपेढीच्या दोन वर्ष चेअरमन आणि पाच वर्षे उपचेअरमन पद भुषविणाऱ्या त्या एक उत्तम नाट्य कलाकार आहेत,



 एक उत्तम गायिका आहेत,एक सामाजिक कार्यकर्त्या आणि निसर्गावर प्रेम करणा-या निसर्गप्रेमी ,सर्पमित्र देखील आहेत,!एक आदर्श गृहिणी म्हणून अनेक भूमिका निभावून दहा अंगाने काम करत स्वाभिमानाने समाज्यात आपलं अस्तित्व निर्माण करणारी ही सावित्रीची लेक !.खऱ्या अर्थाने सौ.राजश्री ( राणीताई ) मुंबईकर यांना त्यांनी रंगभूमीवरील साकारलेल्या दमदार अभिनया करिता अर्थात २००८ मध्ये संपूर्ण रायगड जिह्यात गाजलेलं प्रख्यात आगरी साहित्यिक एल.बी.पाटील लिखित सुप्रसिद्ध नाटक एस.ई.झेड. या नाटकात केलेल्या दमदार अभिनया करिता राज्य स्तरीय नाट्य स्पर्धेच्या १४ नाटकांमधून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने त्या कालचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले होते 



आणि ह्याच नाटकाच्या माध्यमातून जनतेत झालेली जनजागृती आणि लोकांनी दिलेला सेझ विरोधी अभूतपूर्व प्रचंड लढा या मुळे उरण,पेण,पनवेल या तीन तालुक्यात होऊ घातलेला सेझ हद्दपार झाला. त्याच सोबत शिक्षण क्षेत्रात काम करत असतानां गरीब गरजूवंत विद्यार्थ्यांच्यां व आदिवासी विद्यार्थ्यांच्यां शिक्षणाकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्यासोबतच त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांच्या खांद्याला खांदा लावत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या समाजसेविकेला सिने अभिनेते मयुरेश कोटकर यांच्या शुभहस्ते मनसे महिला महोत्सव उरण रायगड येथे विशेष सेवा पुरस्कार या मानाच्या पुरस्काराने सन्मानीत देखील करण्यात आले.



थोडे नवीन जरा जुने