उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केअर ऑफ नेचर व साईमंदिर वहाळ यांच्या संयुक्त विदयमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला भगिनींचा शुक्रवार दि 9 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता श्री साईमंदिर वहाळ येथे विशेष पुरस्कार देऊन महिलांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पार्वती रविंद्र पाटील , संगीता सचिन ढेरे, राजश्री राजेंद्र मुंबईकर, कविता राकेश म्हात्रे,कु.श्रावणी वानखेडे, शोभा एकनाथ म्हात्रे,सुमन संग्राम तोगरे, वैशाली घनश्याम कडू,सोनाली धीरज बुंदे , अभया भालचंद्र म्हात्रे,श्रद्धा सुनिल पानमंद,सीमा पाटील,दिपाली गोडघाटे,प्रियवंदा तांबोटकर , श्लोक निखिल पाटील,अनिता सिंग, अश्विनी धोत्रे या महिलांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यप्रसंगी श्री साई मंदिर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील,केअर ऑफ नेचरचे संस्थापक अध्यक्ष राजू मुंबईकर, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र पाटील , शिरीष कडू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
एन. आर. आय. पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी रविंद्रजी पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक )यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विविध क्षेत्रात स्त्रिया करत असलेल्या प्रत्येक कार्याचा त्यांनी गौरव केला.प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले अनमोल योगदान देत समाजात देत असतात.आपलं कर्तुव सिद्ध करणाऱ्या या रणरागिणीच्यां कार्यातून दुसऱ्यांनी स्फुरण घेऊन समाजात सुशासन येवो आणि समृद्ध समाज घडविण्यासाठी आपल प्रत्येकाने योगदान द्यावं. तरच खऱ्या अर्थाने या सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आलेल्या महिला भगिनींच्या कार्याचा गौरव होईल असं म्हणत सन्मानित सर्व महिला भगिनींना रविंद्र पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रमुख श्रीसाई देवस्थान साई मंदीर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की आपणां सारख्याच्यां योगदानातून आज ही चांगला समाज उभा राहत आहे आणि राहील यात शंका नाही !
समाजाप्रती असलेल्या आपल्या समर्पक भावनेसाठी व आपल्या अलौकिक कार्यासाठी आम्हीं मनापासुन शुभेच्छा देतो या पुढे आपल्या हातून अशीच समाज सेवा घडत राहो असं म्हणत रवीशेठ पाटील यांनी महिला दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.साई मंदिर वहाळ येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने सर्व पुरस्कार प्राप्त महिलांनी आयोजकांचे आभार मानले. एकंदरीत सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन प्रसिद्ध हास्य कलाकार सुशांत शिंदे व जीवन डाकी यांनी केले. शेवटी रविशेठ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
Tags
उरण