नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशनला नवघर रेल्वे स्टेशन असे नाव देण्याची मागणी मागणी.






मागण्या मान्य न झाल्यास निदर्शनाचा इशारा

उरण दि 10 ( विठ्ठल ममताबादे)उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाटयाने होत असून आता मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत उरण ते सीएसटी (मुंबई )रेल्वे सेवाही सुरू होणार आहे.त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते मर्मगंध पाटील, रायगड भूषण प्रा एल.बी. पाटील हे गेली 10 वर्षापासून नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशनला नवघर नाव देण्यात यावे यासाठी पाठपुरावा करत


 आहेत.आता काही दिवसात रेल्वे सुरु होणार आहे मात्र नवघर गावा नजीक असलेल्या रेल्वे स्टेशनला न्हावा शेवा रेल्वे स्टेशन असे नाव दिल्याने नवघर कुंडेगाव, नवघर पाडा ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. नवघर ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ, सिडको व रेल्वे प्रशासन यांच्या अनेक संयुक्त बैठका झाल्या. या बैठकीतही नवघर गावाजवळ असलेल्या रेल्वे स्टेशनला नवघर रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली.


लेखी पत्रव्यवहारही करण्यात आला , मात्र न्हावा शेवा गावाचा काडीमात्र संबंध नसताना नवघर येथील रेल्वे स्टेशनला न्हावा शेवा रेल्वे स्टेशन असे नाव दिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.या संदर्भात 8/3/2023 रोजी नवघर ग्रामपंचायत, नवघर ग्रामस्थ मंडळ, ग्रामस्थ,जेष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील यांनी तेथील रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. नवघर येथील रेल्वे स्टेशनला न्हावा शेवा रेल्वे स्टेशन हे नाव न देता नवघर रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदना द्वारे रेल्वे अधिकारी अविनाश सिंग यांच्याकडे करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास सोमवार दि.13 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वा. रेल्वे स्टेशन समोरच तीव्र निदर्शने करण्याचा इशारा जेष्ठ साहित्यिक, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल. बी. पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.


थोडे नवीन जरा जुने