देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून व्यवसायाभिमुख शिक्षण महत्वाचे ठरणार; सीकेटी महाविद्यालयाची स्वायत्त विद्यापीठाकडे वाटचाल - नामदार चंद्रकांतदादा पाटील
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे दातृत्व वृत्ती - नामदार चंद्रकांतदादा पाटील 
पनवेल(हरेश साठे) देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून व्यवसायाभिमुख शिक्षण महत्वाचे ठरणार असून शिक्षणासोबत सामाजिक जाणीव असलेल्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने घेतलेली भरारी स्वायत्त विद्यापीठाकडे वाटचाल करीत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (दि. ११ मार्च) खांदा कॉलनी येथे आयोजित समारंभात केले. 


दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला २५ वर्ष झाले आहे. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा दोन दिवसीय 'रौप्य वर्ष महोत्सव समारंभ' आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आज पहिल्या दिवशी हा सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. 


नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले कि, लोकनेते रामशेठ ठाकूर गरीब परिस्थितीतून सातारा येथे कर्मवीरांच्या भूमीत शिकले. त्यांना कर्मवीर अण्णांचा सहवास लाभला आणि त्यांचे दातृत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अंगिकारले. देणाऱ्याने देत रहावे आणि घेणाऱ्याने घेत राहावे म्हणजे दान करण्याची वृत्ती घेत जावे आणि ती देण्याची वृत्ती आहे म्हणूनच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दातृत्वाचे धाडस होत आहे असे सांगतानाच हे सीकेटी महाविद्यालय विद्यापीठ होण्याच्या मार्गावर असल्याचे अधोरेखित केले. आपण प्रत्यक्ष रोजच्या जीवनामध्ये पाहतो या वयामध्ये सुद्धा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे प्रचंड उत्साह आणि नवीन काहीतरी करण्याची तयारी आणि सगळ्यात महत्वाचे ताकदीने करण्याची तयारी त्यांच्याकडे असते आणि असे व्यक्तिमत्व आपल्याला मिळाले. आणि त्यामुळेच १९९७ साली ६७ विद्यार्थी घेऊन सुरु झालेले हे कॅम्पस दरवर्षी ४ हजार संख्येपर्यंत पोहोचले. 

पण एक शिक्षण संस्था म्हणून ज्या ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. आता प्रदर्शनात पाहताना मला महाविद्यालयाला मिळालेल्या सगळ्या पुरस्कारांमधले एक गोष्ट एक्झॅक्टली सापडले ते म्हणजे इनव्हर्सिटी ग्रँड कमिशनने त्यांना फार आधी एक्सलन्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो की भविष्यामध्ये ज्यांना खूप मोठे भवितव्य आहे अशा प्रकारचा इन्व्हर्सरी ग्रँड कमिशन एक अवॉर्ड देते कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सेलन्स म्हणजे ज्यांच्यामध्ये पोटेंशनल आहे ज्यांच्यामध्ये क्षमता आहे तो पुरस्कार सीकेटी महाविद्यालयाला २००३ सालीच मिळाला आहे. देशभरातल्या कॉलेजेसचा अभ्यास केल्यानंतर दिला जाणारा हा पुरस्कार सीकेटी महाविद्यालयाला २० वर्षांपूर्वीच मिळाला आहे विशेषतत्वाने सांगायचे झाले तर हे यूजीसीला पण माहित होते कि हे महाविद्यालय दूरदृष्टीचे आहे.त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचा बेस्ट कॉलेज अवार्ड मिळाल्यानंतर अविष्कार मध्ये सलग नऊ वर्ष अवॉर्ड मिळाल्यानंतर आणि खेळामध्ये अभिनयामध्ये सगळे पुरस्कार मिळाल्या नंतर खरं म्हणजे या कॉलेजने मिळविलेले प्राविण्य पाहता त्यातलं जे राहिलं होतं ते मी प्रदर्शन बघताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या डोक्यात मी सोडलं की आता स्वायत्त विद्यापीठ आम्ही द्यायला सुरुवात केली की ज्या विद्यापीठांमध्ये आपल्याला कोर्सेस स्वातंत्र्य असतं. कोणते कोर्सेस घ्यावेत परीक्षा कशी घ्यावी किती विद्यार्थी संख्या घ्यावी व आपल्या विद्यापीठाचा आणखी एखाद्या विदेशातल्या विद्यापीठाची टाईप करावं का असं सगळं स्वातंत्र्य असते आणि स्वायत्त विद्यापीठाचा एक विचार मी त्यांच्या डोक्यात सोडला आणि मला खात्री अशी आहे की, तेही लोकनेते रामशेठ ठाकूर पूर्ण करतील.विशेष म्हणजे स्वायत्त विद्यापीठ होण्यास त्यांना कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन त्यांच्या पाठीशी राहील असे आश्वसनही त्यांनी दिले. माननीय पंतप्रधान मोदीजींनी आता या देशांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणायचे ठरविले आहे त्या अनुषंगाने शिक्षणासोबत देशाचे संस्कार घडणार आहेत. 


असे नमूद करतानाच पदवी प्रमाणपत्र समारंभाशिवाय मिळत नसल्याने अनेकांना विदेशातील नोकरी किंवा इतर शिक्षणासाठी थांबावे लागते मायंत्र यापुढे पदवीदान समारंभची वाट पहात बसायला लागणार निकाल लागला कि त्याच दिवशी तुमच्या डिजिटल लॉकर मध्ये तुमची डिग्री येणार आहे. अशा खूप गोष्टी आगामी काळामध्ये होणार आहेत. शिक्षणाचा स्वरूप बदलायचं आहे, विदेशातल्या अनेक विद्यापीठांनी आपल्या विद्यापीठाची टायप सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परंपरागत कॉलेजच्या बरोबर भविष्याचा वेध घेतलेला आहे आणि त्यामुळेच या सीकेटी कॉलेजने उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या सगळ्या प्रवासामध्ये महाराष्ट्र सरकार त्यांच्या बरोबर राहील, असेही नामदार चंद्रकांत पाटील यांनी आश्वासित केले. अध्यक्षीय भाषणात बोलताना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, २५ वर्षांच्या कालखंडात सीकेटी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचावला. १९९७ साली साली सुरु झालेले हे विद्यालय अनेक सन्मानाने सर्व क्षेत्रात अग्रेसर ठरले. छोटेसे कॉलेज आज मोठे झाले आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मोठे झाले, त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. दर्जेदार शिक्षण पाहता दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढते त्यामुळे काहींना प्रवेश देणे कठीण होते असे नमूद करतानाच आपली मातृसंस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेने कर्मवीर अण्णांच्या नावाने विद्यापीठ सुरु केले आणि आता सीकेटी कॉलेजचे विद्यापीठ व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असून या करीता आपले सहकार्य असावे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले. थोडे नवीन जरा जुने