अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्ताने,खरवई ते उंबरखिंड कृषी अधिकारी यांनी मशाल रॅली








काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १२ मार्च, कृषी खाते सातत्याने शेतकरी बांधवांच्या संपर्कात राहून वेळोवेळी सहकार्य करीत असतात.हा वर्षे अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य असल्यामुळे प्रत्येक महिन्यात येणारे विविध सण,जयंती,उत्सव,पुण्यतिथी अदि या दिनांचे औचित्य साधून खालापूर तालुका कृषी खात्याच्या माध्यमातून तालुक्यात विविध उपक्रम हाती घेवून करण्यात येत असतात.खरवई ते उंबरखिंड बाईक रॅली,मशाल,ज्योत काढण्यात आली.जिल्हा आधिक्षक कृषी अधिकारी,आलीबाग बानखिले मॅडम,व उप विभागीय कृषी अधिकारी,खोपोली यांचे मार्गदर्शना खाली तालुका कृषी अधिकारी, अर्चना सुळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम हाती घेण्यात आले.



                 शिवशक्ती मिञ मंडळ,खरवई यांचे सहभागातुन उंबरखिंड येथे ही बाईक रॅली मशाल ज्योत या ठिकाणी घेवून गेले.यावेळी खालापूर तालुक्यातील कृषी अधिकारी आणी शिवशक्ती मंडळांचे कार्यकर्ते या मध्ये सहभागी झाले होते.उंबर खिंडीचा इतिहास असा आहे,की २ फ्रेबु १६६१ रोजी.छत्रपती शिवाजी महाराज्यांनी कारतलब खान स्त्री सरदार रायबागन व तीस हजार फौजेचा उंबरखिंड या ठिकाणी पराभव केला.कोकण काबीज करण्यासाठी कारतलब खान हा आंबेनाळ उंबरखिंड मार्गावर उतरणार हे महारांजाना समजताच त्यांनी स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांना पुढे जावून छावणी टाकण्यास सांगितले.स्वराज्याचे सैन्य उंबरखिंडीत उतरेल न उतरेल तोच छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला


.एका बाजूने नेताजी पालकर दुस-या बाजूने शिवाजी महाराज असे कोंडीत पकडून अचानक झालेल्या हल्यामुळे खानाच्या सैन्यांनी माघार घ्यावी लागली.या लढाईचे वैशिष्ट्य अशी कि कमी सैन्याने प्रचंड शत्रूंचा गनिमी काव्याने पराभव केला.छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण २७ लढाई केल्या त्यामधील हि उंबरखिंड येथील लढाई.अशी वैशिष्ट्य या उंबरखिंडीची आहे

.         
        यावेळी या बाईक रॅलीत मंडळ कृषी अधिकारी जे.के.देशमुख,एस.टी.धुमाळ,सबाजी पोटे कृषी पर्यवेक्षक व आण्णासाहेब देवकर.सहा.अधीक्षक,संतोष वलेकर.वरीष्ठ लिपीक, तसेच रावसाहेब आंधले,मंजुशा शिंदे,चेतन चौधरी,अजित फराटे,निलेश पाटील, नितीन रांजुन, चिञा सांरग,जयश्री पाटील व अनील कोळी,कृषी सहाय्यक ,प्रज्ञा पाटील बी.टी.एम.व सातपुते कर्मचारी यांनी मशाल बाईक रॅलीत सहभाग घेतला .शिवशक्ती मिञ मंडळ चे अनिकेत भोसले व सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले



थोडे नवीन जरा जुने