वैधमापनशास्त्र यंत्रणा विभाग नवी मुंबई कडून जागतिक ग्राहक हक्क दिन २०२३ वाशी येथे संपन्ननवी मुंबई - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभाग तसेच वैध मापन शास्त्र यंत्रणा विभाग नवी मुंबई कडून वाशी येथे नागरिकांना ग्राहक हक्कांविषयी तसेच वस्तूंवरील वजन इ. माहिती बाबत प्रबोधन माहिती देऊन जनजागृती उद्देशाने आयोजन वैध मापन शास्त्र यंत्रणा वाशी नवी मुंबई विभागमार्फत करण्यात आले होते.


 
   बाजारात विक्रीसाठी असणाऱ्या वस्तूंच्या आवरणावर एमआरपी, वजन, उत्पादनाची तारीख,पॅकेर्सवर पूर्ण पत्ता ,ग्राहक, ई - मेल, दूरध्वनी क्रमांक इ. प्रिंट करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र नागरिक ह्या सूचना तपासून घेत नसल्याने अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. शासनाच्या वैधमापन शास्त्र विभाग अशा व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवते. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची व विक्रेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. 


या दिवशी ग्राहकहिताची जनजागृती करणारे कार्यक्रम राबविले जातात. या जनजागृतीचा एक भाग म्हणून वैधमापन शास्त्र विभागाच्या वतीने स्टॉल लावून वजनकाटे, मापे, आवेष्ठित वस्तू उत्पादनांवरील आवश्यक माहिती इ. बद्दल प्रात्याक्षिके माहितीसह देण्यात आली.


 तसेच ग्राहक जनजागृती माहितीपत्रके वाटण्यात आली. यावेळी वैध मापन शास्त्र यंत्रणा विभाग एस.एस.कदम उपनियंत्रक, ठाणे - पालघर जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली वाशी - १ विभागाचे निरीक्षक सुहास कुटे, आणि वाशी -२ विभागाचे निरीक्षक मधुकर राठोड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षेत्र सहाय्यक अनंता कोशिंबे, यांनी परिश्रम घेतले, यावेळी महिला आणि सामान्य नागरिक जागतिक ग्राहक हक्क दिन नागरीकांनी उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला. उपयुक्त माहिती मिळाली म्हणून यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने