पनवेल दि. १५ (वार्ताहर ) : जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून पनवेल महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुकादम म्हंणून गेली अनेक वर्षे सेवा करणाऱ्या, वर्षांतील ३६५ दिवस पनवेल शहर स्वछ ठेवण्याचे काम करणाऱ्या महिलांचा स्वच्छता देवदूत" म्हणून सन्मान करण्यात आला .
ऊन वारा,पाऊस ,अथवा कोणताही साथरोग आल्यास या महापालिकेच्या कामगार आपल्या जीवाची परवा न करता शहराची सेवा करतात या शहरासाठी त्यांचे मोठे योगदान आहे आणि म्हणूनच त्या सन्मानास पात्र आहेत म्हणूनच त्यांचा आज स्वछता देवदूत पुरस्काराने सन्मान करीत असल्याचे पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी जेष्ठ पत्रकार पनवेल टाइम्स चे संपादक गणेश कोळी , जेष्ठ पत्रकार संजय कदम ,महानगरचे प्रतिनिधी समीर वैश्विकर ,जागृती फाऊंडेशन चे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे ,कामगार नेते शरद कांबळे ,सतीश चिंडालीय आदी मान्यवर उपस्थित होते .
महराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपरिषद ते पनवेल महानगर पालिका असा प्रवास असलेल्या महानगर पालिकेचा गाडा सर्वच विभाग चालवत आहेत ,अनेक वर्षे शहराची सेवा करणाऱ्या , शहर स्वछ सुंदर ठेवण्याचे काम करणाऱ्या सफाई कर्मचारी ते मुकादम असा प्रवास असलेल्या
पनवेल महानगर पालिकेच्या महिला मुकादम म्हणून काम करणाऱ्या ममता टाक, भारती शेलार ,मीना चरण ,रंजना चव्हाण ,अरुणा जाधव ,गुलाब हरवंडकर ,छाया चित्ते या महिलांचा सन्मान जागृती फाऊंडेशन ,आणि पनवेल युवा च्या वतीने करण्यात आला ,या कार्यक्रमासाठी पनवेल मधील द्वारकादास साडी आणि द्वारकाधीश साडी यांनी सहकार्य केले .फोटो- महिला मुकादमांचा स्वछता देवदूत पुरस्काराने सन्मान
Tags
पनवेल