पनवेल दि.15(संजय कदम): राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांबाबात लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपाला निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशने पाठींबा दिला असून, याबाबत असोसिएशचे अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने, पोलिस उपायुक्त परिमंडळ- 2 मधील सहाय्यक पोलिस निरीक्षक माने, तसेच तहसीदार कार्यालयात पाठींब्याचे तसेच मागण्यांचे निवेदन दिले.
राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवृत्त अीधकारी, कर्मचारी यांना सेवेत असताना मिळत असलेल्या वैद्यकीय सेवा सुविधा या पुढे कायममिळाव्यात, शिक्षक मतदार संघाप्रमाणे पोलिस मतदार संघास मान्यता मिळावी, निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय कार्यक्रमात सन्मानाने निमंत्रित करण्यात यावे, पोलिस ठाण्यात असलेल्या दक्षता समिती व मोहल्ला कमिटी यामध्ये निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी करुन घेणे, निवृत्त अीधकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांना शासकिय नेकरीमध्ये 10% आरक्षण असावे तसेच शैक्षणिक क्षेत्रात योग्य ती सवलत मिळावी, जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या असून, लक्षणिक संपाला पाठींबा असल्याचे पत्र देण्यात आले.
या वेळी असोसिएशने केलेल्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी लेखी अहवाल पाठवण्याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी विनंती केली. निवेदन देते वेळी निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोिएशनचे अध्यक्ष विनोद चव्हाण, उपाध्यक्ष विभा चव्हाण, तुळशीरामसत्रे, सचिव अरविंद संखे, खजिनदार बबन इलग, नंदकुमार शिंदे, सदस्य पोपेरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
Tags
पनवेल