रणरागिणी पै.अमेघा अरून घरत हीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आजारी असून सूध्दा उल्लेखनीय कामगिरी करून रायगड जिल्ह्याला कांस्यपदक मिळवून देण्याचा विक्रम केले आहे.सांगली येथे भरलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कास्य पदक मिळवून अमेघा घरतने रायगड जिल्ह्याचे नाव अजरामर केले आहे.
दि.२३ मार्च ते २४ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यात सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वरिष्ठ २४ व्या महाराष्ट्र राज्य महिला अजिंक्यपद आणि पहिली महिला केसरी कुस्ती स्पर्धेत कोकणातील महिला कुस्तीगीरांनी नेत्रदीपक कामगिरी केली.राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील उरण तालूक्याची सूकन्या व सी के टि काॅलेज पनवेलची स्टार पैलवान पै.अमेघा अरुण घरत हिने ५९ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे.सी. के. टी काॅलेजचे प्राचार्य डॉ एस के पाटील, मार्गदर्शक डॉ विनोद नाईक, वस्ताद राष्ट्रीय पैलवान रूपेश पावशे, वस्ताद डि बी भाई म्हात्रे व आई बाबा यांचे अमेघा घरतला नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे
.अमेघा हि सी के टी कालेज व छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुल नितलस तालमीत सराव करते.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष,लोकनेते शरद पवार ,कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते,सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,खजिनदार सुरेशदादा पाटील,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे वरीष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव आबा शिंदे,संभाजी वरुटे,दयानंद भक्त,गणेश कोहले,तांत्रिक सचिव बंकट यादव,कार्यालयीन सचिव ललित लांडगे,कार्यकारी सदस्य अमृता भोसले,संपत साळुंखे,विनायक गाढवे, हिंदकेसरी पै दिनानाथ सिंह,रुस्तुम ए हिंद पै.अमोल बुचडे,अखिल भारतीय शैली कुस्तीचे सहसचिव शेखर शिंदे,आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक उत्तमराव पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव मारुती आडकर,कार्यकारी सदस्य सुभाष ढोणे,सुभाष घासे,,पंढरीनाथ ढोणे (बापू) ,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर पनवेल तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बळिराम पाटील,गजानन हातमोडे,
अशोक पाटील, राजेश भाईर,जयराम गवते,भालचद्र भोपी,पनवेल तालूका कुस्ती असोसिएशन व रायगड जिल्हा कुस्तीगीर सघं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी,तांत्रिक अधिकारी,पंच,प्रशिक्षक,मान्यवर,वस्ताद कुस्तीगीर यांनी अमेघा घरत हिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमेघा घरत हिला कुस्ती स्पर्धेत कास्य पदक मिळाल्याने तीचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
Tags
उरण