धार्मिक कार्यासाठी मदत करणारे नेते रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्याकडून धाकटी जुई येथील हनुमान मंदिरासाठी एक लाखाची मदत
उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )

सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तीची लोकप्रियता वाढत चालली आहे अशी व्यक्ती म्हणजे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत सतत अनेक क्षेत्रातील गोष्टीसाठी सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा अशा अनेक कार्यामध्ये उपस्थित राहून त्यांना आर्थिक मदत करणे हे आपले कर्तव्य समजून सतत अनेकांना ते मदत करत आहेत.


जवळजवळ एक दोन महिन्यांमध्ये वीस ते पंचवीस मंदिरांना, अनेक क्रिकेट स्पर्धा, सामाजिक उपक्रमांमध्ये ते मदत करत आहे, परमेश्वरा विषयी श्रद्धा असणारे महेंद्र शेठ घरत अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्र पाहण्यासाठी भारत आणि भारताच्या बाहेर जात असतात.
मग त्यामध्ये हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ धार्मिक यात्रा कैलास मानसरोवर, केदारनाथ, बद्रीनाथ, पशुपतिनाथ, रामेश्वरम, बारा ज्योतिर्लिंग, देशातील सर्व धार्मिक स्थळाचे दर्शन तर काश्मीर ते कन्याकुमारी, लेट लदाब अशा अनेक ठिकाणी त्यांनी धार्मिक स्थळ बघितली आहेत. त्यामुळे रायगडांमधील अनेक मंदिरांसाठी ते मदत करत असतात. उरण तालुक्यातील धाकटीजुई गावातील ग्रामस्थ मंडळ महेंद्र शेठ घरत यांच्याकडे मदतीसाठी गेले असता त्वरित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी त्यांना एक लाखाचा चेक देऊन मदत केली त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.


थोडे नवीन जरा जुने