ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन चे अध्यक्ष माननीय संजय वासुदेव पवार यांच्या अध्यक्षते खाली व कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे यांच्या शिपींग क्षेत्रातील अनूभवाने आजवर च्या शिपींग क्षेत्रात नावाजलेल्या ठराविक यूनियन आहेत परंतू गेल्या ४ वर्षात सिफेरर्स ची सर्वात जास्त पसंती असलेली संध्याची एकमेव यूनियन म्हणून ॲाल इंडिया सिफेरर्स आणि जनरल वर्कर्स यूनियन चे नाव सोशल मेडिया च्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. सिफेरर्स साठी ग्राउंड लेवल वर काम करणारी ही यूनियन आहे ज्यांनी कमी वेळात भारतीय सिफेरर्स चे मन जिंकले आहे आणि केंद्रिय मंत्रालयात आपला वेगळाच वलय निर्माण केला आहे.
आता ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन ने शिपींग मध्ये काम करणाऱ्या ॲाफिसर सेक्शन जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह करण्याचे योजीले आहे. न्याय देणे हा आमचा धर्म आहे मग तो जहाजावर काम करणाऱ्या सर्व खलाशांसाठी असेल म्हणून यूनियन च्या मेन बॅाडीवर जनरल सेक्रेटरी म्हणून माननीय श्री. अमर सिंग ठाकूर यांची निवड यूनियन चे अध्यक्ष संजय पवार यांच्या कडून करण्यात आली आहे.
आपण सर्वांची सोबत हीच आमची ओळख आणि आपला विश्वास हे आमचे प्रमाणपत्र ही भावना मनात ठेवून आता यूनियन ची टीम ही नाविकांना सर्व परी न्याय देण्याचे काम करणार आहे.
भारतामध्ये संध्या शिपींग क्षेत्रात बाकी यूनियन च्या तुलनेत सर्वात जास्त फोलोवर असलेली यूनियन म्हणून आज All India Seafarer & General Worker Union चे नाव सिफेरर्स आदराने घेतो.
हे सिफेरर्स चे प्रेम आणि हे यशही सिफेरर्स चेच आहे!
असेच प्रेम ॲाल इंडिया सिफेरर्स युनियन वर असू द्या आणि लवकरच एक वेगळे परिवर्तन आपण शिपींग क्षेत्रात आणू असे आश्वासन देतो.
ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन चे अध्यक्ष यांच्या आदेशावरून माननीय अमर सिंग ठाकूर यांची जनरल सेक्रेटरी पदावर नियूक्ति झाली ही नियूक्ति सिफेरर्स च्या भविष्यात एक आशेचा किरण घेवून येईल व शिपींग क्षेत्रातील सर्व त्रृटी भरून येतील अशी आशा आहे. संजय पवार यांनी सांगितले की, जनरल सेक्रेटरी या पदावर अमर सिंग ठाकूर यांची नियूक्ति करून शिपींग क्षेत्रात नव्याने बदल करण्यास मी त्यांना हवी ती मदत करुन सिफेरर्स चे भविष्य घडवण्यास सहाय्य करेन
तसेच यूनियन चे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी अमर सिंग ठाकूर यांच्या नियूक्ति वरून आता शिपींग क्षेत्रात सिफेरर्स चे सर्व प्रश्न आम्ही सोबत मार्गी लावू असे सांगितले. शिपींग क्षेत्रात होणार्या आर्थिक फसवणूक तसेच सिफेरर्स चे ई गव्हर्नन्स च्या समस्या व सिफेरर्स चे कंपनी शी होणार्या समस्या यावर आम्ही सर्व ॲाल इंडिया सिफेरर्स ची टीम काम करू व सिफेरर्स ना न्याय मिळवून देवू.
Tags
पनवेल