रायगड जिल्हास्तरिय निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.







उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र अलिबाग, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे, आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरिय खुल्या गटातील निबंध स्पर्धेचे श्री साई मंदिर देवस्थान साईनगर वहाळ येथे देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा कोकणरत्न रविशेठ पाटील यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले.



ह्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक हरिश्चंद्र नामदेव पाटील- दिघाटी, द्वितिय क्रमांक नैनिता नरेश कर्णिक, तृतीय क्रमांक विजय राम साईलकर यांनी पटकावले. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख रक्कम दोन हजार रुपये, दीड हजार रुपये व एक हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे चैताली किरण म्हात्रे, सन्मेश स्वयंम धर्मा ओवळेकर या उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. ह्या निबंध स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विद्याधर पाटील व शिक्षिका स्नेहल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांनाही आयोजकांच्या वतीने सन्मानीत करण्यात आले.



साई देवस्थानचे रविशेठ पाटील यांनी आपल्या मनोगतातून सर्व विजेत्या स्पर्धकांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन तसेच स्पर्धेचे आयोजकांचे मनभरून कौतुक करुन सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी भारतीय सैनिक निलेश म्हात्रे, आदर्श शिक्षक मो. का. मढवी गुरूजी, नवी मुंबई एस. बी. आय. बँकेचे माजी मुख्य उपप्रबंधक धनंजय तांबे, रायगड भूषण राजू मुंबईकर, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, नेहरु युवा केंद्राचे माजी राष्ट्रीय सेवाकर्मी आकाश घरत, जाणीव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनिल ठाकुर, दिनेश पाटील, डॉ. विजय हंकारे, चिंतामण पाटील, रुपेश मढवी, प्रणित मढवी, रोहित कोळी, अनिल कांबळे, सचिन पाटील, राकेश जाधव व ईतर साईभक्त उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने