महाविद्यालयातील क्रीडा, कला, संशोधन, सेवा क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यानी विभागीय, विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश प्राप्त केले, अशा विद्यार्थ्याचा आणि महाविद्यालयीन स्पर्धामध्ये विजेत्या विद्यार्थ्याचा सत्कार विविध मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे एच. एस. एन. सी. विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि एच. एस. एन. सी. मंडळाचे सचिव मा. प्रा. दिनेश पंजवानी, तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख आणि संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे, पनवेल शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मा. श्री. मनोहर म्हात्रे, विद्यार्थी परिषद ,सरचिटणीस कु. रिओना रिचर्ड पूजारी, विद्यार्थी कल्याण, सरचिटणीस कु. स्नेहल नरवडे, महिला विकास कक्ष, सरचिटणीस कु स्वर्णिम अंबास्था आदी मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने इतिहास विभागाच्या “जिज्ञासा” च्या २५ व्या पत्रिकेचे अनावरण केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील यांनी महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला, तसेच भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली व पाहुण्यांची ओळख करून दिली. मा. प्रा . दिनेश पंजवानी यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले की महाविद्यालयाने २५ वर्षात मोठे यश संपादन केले आहे जे ५० वर्षातही शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांना उद्देशुन सांगितले की तुम्ही या संस्थेचा भाग आहात हे तुमच्यासाठी अभिमानास्पद आहे आणि कुठलेही हाती घेतलेले कार्य पूर्ण केल्याशिवाय सोडू नका . संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दैदिप्यमान यश प्राप्त केलेल्या विद्यार्थांचे अभिनंदन केले आणि असे संबोधिले की संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांचे चांगल्या पायाभूत सुविधांसह नावाजलेले महाविद्यालय उभारण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.
तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा नृत्य, गायन आणि अभिनय यांचा कलासंगम असणारा दर्पण २०२३ हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात सादर झाला. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून “सातव्या मुलीची सातवी मुलगी” फेम अजिंक्य ननावरे आणि “चला हवा येउ द्या” फेम संदीप रेडकर आणि “टिपक्यांची रांगोळी” फेम शीतल रेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ आर. व्ही. येवले, हिंदी विभागाच्या प्राध्यापिका व सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा डॉ. जी. एस. तन्वर, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक ए. व्ही. पाटील व आभारप्रदर्शन डॉ. जी. एस. तन्वर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील, रौप्य महोत्सवी समारंभाचे समन्वयक डॉ. डी. एस. नारखेडे, कलाशाखेचे प्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पाटील, वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रो. डॉ. एस. बी. यादव, विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर आणि आय. क्यू. ए. सी. विभागाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, कार्यालयीन अधीक्षक पी. एस. म्हात्रे, हेड क्लार्क जी. के. सुर्वे , जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. वी. बी. नाईक, रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर, महिला विकास कक्षाच्या समन्वयिका डॉ. आर. डी. म्हात्रे, विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण समितीच्या समन्वयिका
डॉ. एम. ए. म्हात्रे, सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा डॉ. जी. एस. तन्वर, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप आणि तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags
पनवेल