सैनिकी स्कूल परीक्षेत कळंबोलीतील आय कॅन चे सहा विद्यार्थ्यांची पहिल्याच फेरीत निवड







पनवेल दि.२५ (वार्ताहर) : आर्मी नेव्ही आणि एअर फोर्स मध्ये भावी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या मुला मुलींसाठी दरवर्षी ऑल इंडिया सैनिकी स्कूल परीक्षा घेतली जाते. अत्यंत कठीण आणि अवघड समजल्या जाणाऱ्या या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. पहिल्याच फेरीमध्ये कळंबोलीतील एकूण सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे सर्वजण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी आहेत. या ज्ञानवंत गुणवंत आणि यशवंत मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.



                      आपल्या पाल्यांना शिस्त लागावी, त्याचबरोबर ते उच्चपदस्थ अधिकारी व्हावेत या पार्श्वभूमीवर सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचा ओढा आजही सर्वाधिक आहे. येथे शिक्षण घेणारे बहुतांशी विद्यार्थी देशाच्या तिन्ही दलामध्ये उच्चपदस्थ अधिकारी होत असल्याचे रेकॉर्ड आहे. त्यासाठी अगोदर एनडीए चे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्याची तयारी करण्यासाठी भारतामध्ये सर्वात पहिले सैनिकी स्कूल सातारा येथे 1961 साली झाले. मागील पाच वर्षापूर्वी चंद्रपूर सह देशात एकूण 33 सैनिकी शाळांची संख्या होती. आता आणखी अठरा शाळांना मान्यता मिळाली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा द्वारे होते. अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या परीक्षेमध्ये कळंबोलीतून यावर्षी अर्णव चिंचकर, अव्देत माने, सर्वेश डोंबाचे, अंश देसाई, सिद्धांत खरे आणि उत्कर्ष दूधभाते या मुलांना यश मिळाले आहे. हे सर्व विद्यार्थी कळंबोली येथील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये ही आणखी काही विद्यार्थ्यांची निवड अपेक्षित आहे.
थोडे नवीन जरा जुने