विक्री करीता आणलेले अडीच हजार किलो गोमांस पनवेल तालुका पोलिसांनी केले जप्त; आरोपी फरार







पनवेल दि.२५ (वार्ताहर) : महिंद्रा बोलेरो पिकप टेम्पोतून गाय बैल व म्हैस यांची कत्तल करून सुमारे अडीच हजार किलो मांस विक्री करण्याकरता ताब्यात बाळगल्या प्रकरणी दोघां विरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



           मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर भाताण बोगदाच्या जवळ एक बोलेरो पिकप थांबली असून त्यातून लाल पाणी सोडत असल्याचे माहिती एका सजग नागरिकाने पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बोलेरो पिकप क्रमांक (MH १२ QW 2068) ही मुंबईच्या दिशेने पुढे निघाली होती. यावेळी पोलिसांनी वाहन बाजूला घेण्यास सांगून गाडीत काय आहे याची विचारपूस केली असता गाडीमध्ये भूशाच्या गोणी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी



 गोण्याखाली उतरवले असता त्यात कोणत्यातरी प्राण्याचे मांस असल्याचे निदर्शनास आले. यावेळी गाडी चालकाने दुसऱ्या इसमाला काहीतरी इशारा केल्यांनतर त्याने पोलिसाला धक्का मारून ते दोघेही तिथून पळून गेले पोलिसांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते दोघेही झाडीमध्ये गायब झाले. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी बोलेरो पिकप, भुसाच्या गोणी आणि गोमांस जप्त केले आहे.



थोडे नवीन जरा जुने