बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्यांवर खारघर पोलिसांची कारवाई









पनवेल दि.२५ (संजय कदम) : खारघर परिसरात बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करणाऱ्यांवर खारघर पोलिसांनी कारवाई करत १३६० रुपये किमतीचे २२ बाटल्या जप्त केले आहे.
            खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.



 त्याअंतर्गत खारघर परिसर नो-लिकर झोन असतानाही अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या देशी विदेशी मद्यसाठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती त्यांना बातमीदाराद्वारे मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खारघर सेक्टर १९ मुर्बी गाव येथे एक इसम तसेच खारघर गाव सेक्टर १४ येथील दिव्यांग पान स्टॉलच्या बाजुला एक ज्येष्ठ महिला बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याने या दोन्ही ठिकाणी कारवाई करत १३६० रुपये किमतीचे देशी दारुचे २२ बाटल्या जप्त केल्या आहेत.




 आगामी काळात सुद्दा अश्या प्रकारच्या कारवाया खारघर परिसरात होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



थोडे नवीन जरा जुने