शिक्षण क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व भाग्यश्री पाटील


शिक्षण क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व भाग्यश्री पाटील 


उरण तालुक्यातील कोप्रोली गावा मधील महिला सौ.भाग्यश्री आतिश पाटील या गेली १० वर्ष लहान मुलांचे प्ले ग्रुप चालवण्याचे कार्य करीत आहेत.त्यांच्या या कार्याबद्दल संबधित मुलांच्या पालकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. त्या एक उत्तम वास्तू तज्ञ, ज्योतिषी सुद्धा आहेत. २०१९ मध्ये महिला बचत गटाच्या अंतर्गत समुह संसाधन व्यक्ती (CRP) म्हणून नियुक्ती झाल्यानंतर कोप्रोली गावात मोठ्या प्रमाणात बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांना बचत गटाचे महत्त्व काय आहे याबाबत महिलांना प्रबोधन करण्याचे कार्य त्या उत्तमरीत्या करीत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामस्वच्छता,आरोग्य विषयक विविध कार्यक्रम घेऊन महिलांमध्ये चांगल्या विचाराची शिकवणूक देण्याचे कार्य करीत आहेत.
    दि.८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त गावामध्ये महिलांसाठी विविध सांस्कृतिक तसेच क्रीडात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गावातील महिलांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात.तसेच महिलांचे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक समस्या सोडवण्यासाठी उत्तम कार्य करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने