महिला दिना निमित्त लेख.






सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सौं.सोनाली धीरज बुंदे


 जागतिक महिला दीनाचे निमित्त रायगड जिल्हा सतत काही नवीन काम करणाऱ्या सौं सोनाली धीरज बुंदे यांचे कार्य उल्लेखनीय आहे.सह संचालिका मिशन IAS,प्रिंसिपल लिटिल हार्ट्स प्री स्कूल उरण आदी विविध पदावर सोनाली बुंदे कार्यरत आहेत.द्रोणागिरी भूषण, कुलाबा जीविन गौरव पुरस्कार प्राप्त सोनाली बुंदे या संपूर्ण भारतात 1 रुपया मध्ये IAS चे प्रशिक्षण देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला आहेत.


डॉ पंजाबरावं देशमुख मिशन IAS अकॅडमीच्या त्या सह -संचालिका आहेत.सोनाली यांचा 2005 पासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुरु झाला. मुलींना नेहमी वेगळी वागणूक का मिळते ह्या वर त्यांनी लेख लिहले. समाजासाठी खूप काही करायचे आहे ह्या भावनेने त्या असंख्य स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन शिबिर भरवितात.आजपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन केले



.गरीब मुलांना शिक्षणाची मदत कशी करता येईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.सक्षम स्त्रीजात कशी बनवतात येईल ह्यासाठी वेग वेगळे उपक्रम त्या राबवितात. स्वतः च्या आयुष्यात खूप संघर्ष पाहिला असल्यामुळे, इतर स्त्रीला, मुलांना कशी मदत करता येईल ह्याकडे त्या जातीनी लक्ष देतात. लीगल एड कॅम्प त्या घेतात. हेल्थ चेकअप कॅम्प साठी त्या नेहमी अग्रेसर असतात.किती तरी मुलांचे समुपदेशन त्या निशुल्क करतात. मानसिक आणि शारीरिक सक्षम पिढी त्यांना बनवायची आहे त्यासाठी त्या कार्य करत असतात.



थोडे नवीन जरा जुने