फ्रेंड्स फोरएव्हर ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी.क्रिकेट सामन्यातून मिळणाऱ्या मोबदलाचा गावाच्या विकासासाठी सदुपयोग.


क्रिकेट खेळाडूंसमोर ठेवला नवा आदर्श.

उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील विंधणे गावातील फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुप यांच्या वतीने दरवर्षी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते.त्याचप्रमाणे त्यांनी गेल्यावर्षीही आयोजन केले होते.त्या आयोजनामधून जो मोबदला मिळाला त्याचे गेल्यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते.


तसेच यावर्षीही फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपने क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. त्यामधून मिळालेल्या मोबदल्यातून सामाजिक बांधिलकी जपत फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपने पिंपळाचा पाणी (विंधणे- राई)येथे बरीच वर्षे रेलिंग नसलेल्या पुलावर रेलिंग लावण्याचे काम पूर्ण केले.त्यामुळे बरीच वर्षे जीव घेणा प्रवास करणाऱ्या विंधणे गावातील ग्रामस्थांचे प्रवास आत्ता सुखमय आणि सुरक्षित झाला आहे. आणि अपघाताचा धोका पूर्णपणे टळला आहे. या कामामुळे गावातील ग्रामस्थांकडून तसेच थोरा मोठ्यांकडून सर्व सभासदांचे कौतुक होत आहे. यावेळी फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपचे सभासद -संदेश पाटील,प्रल्हाद पाटील,राजन लोखंडे, समाधान जोशी,प्रदीप शेळके, कल्पेश पाटील ,
आशिष पाटील,सुरज पाटील ,सुरज पाटील(बंडा),किरण पाटील, प्रितेश पाटील ,अशोक शिंदे,अमर पाटील,सिताराम थळी, सामाजिक कार्यकर्ते सुनील विश्वनाथ जोशी आदी फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते


.
थोडे नवीन जरा जुने