नगराजशेठ सीबीएसई स्कूल उरणमध्ये नंबर वन : प्रविण पुरो





उरण दि.14 (विठ्ठल ममताबादे) सध्याच्या आधुनिक शिक्षणाने भौतिक ज्ञानाची प्रचंड वाढ झाली आहे. मुलांच्या भावनिक, मानसिक व बौद्धिक, विकासाच्या अनुषंगाने पोषक बाबींचा, तंत्रांचा विचार होत गेला. त्यामुळे शिक्षण हे प्रवाही आणि परिवर्तनशील बनत गेल आहे. काळानुसार बदलणाऱ्या राजकीय, सामाजिक आर्थिक गरजांच्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल होत गेले





.असे स्पष्ट मत उरण मधील ज्येष्ठ पत्रकार तथा सचिवालयातील विधिमंडळ पत्रकार संघटनेचे सचिव प्रवीण पुरो यांनी मांडले. ते नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी आपले विचार मांडले . ते पुढे म्हणाले बाळाचे बारसे झाले की लगेच त्याचे नाव शाळेत नोंदविण्याकरिता पालकांची धावपळ सुरु होते. पाल्य पाच वर्षाचा झाला की, त्याच्या पाठीवर पुस्तकांचे ओझे लादले जाते. एक-दोन शिकवण्या लावल्या की, पालक मोकळे होतात. पण अलीकडे शिक्षण क्षेत्रात व्यवसायिकदृष्टया पहिले जाते, शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी आलेल्या मुलांकडे काही शैक्षणिक संस्थांचा पाहण्याचा दृष्टीकोन म्हणजे विद्यार्थी हे शाळेचे ग्राहक आहेत असाच असतो, आणि त्यांच्या पालकांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा ते फायनान्सर असल्याप्रमाणे असतो. त्यामुळे काही शाळा तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता न पाहता पालक कोणत्या कंपनीत कामाला आहे, कोणत्या बँकेत त्याचे खाते आहे, त्या खातेपुस्तकाची पाहणी करूनच प्रवेश निश्चित केला जातो. काहीवेळा पालकांनी आपल्या घरादारांतील मौल्यवान वस्तू विकून पाल्याचा शाळांमध्ये प्रवेश घेतल्याच्या घटना ताज्या आहेत. मात्र नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमुळे आज उरणमधील परिस्थिती बदलली आहे.




उरणचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते नगराजशेठ आपल्यात नाहीत परंतु त्यांच्या कार्याचा वसा आज त्यांच्या नावाने साई संस्थेने सुरु केला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रचंड अनुभव असणाऱ्या साई संस्थेच्या कार्याचा पसारा मोठा आहे. साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील सरांचे डोंबिवली येथे मराठी, गुजराती, इंग्रजी मध्यमाच्या शाळा सुरु आहेत. माणगाव येथे इंग्रजी मध्यमाची शाळा सुरु केली आहे. कोल्हापूरमध्ये एक वैद्यकीय महाविदयालय सुरु केलेले आहे. लवकरच द्रोणागिरीमध्ये इंजिनियरींग कॉलेज सुरु होण्याच्या मार्गावर आहे. हे सर्व करीत असताना ही शैक्षणिक संस्था समाज्यातील शेवटच्या स्तरांतील सामान्य माणसाचा विचार करते. प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याकडे ग्राहक म्हणून न पहाता आणि पालकांचे बँकेच्या खातेपुस्तकाची पाहाणी न करता प्रवेश दिला जातो.हा नगराजशेठ यांच्या कार्याचा वसा त्यांनी जपला आहे. म्हणून दर्जेदार शिक्षण हवे असेल तर आपण सर्वांनी आपल्या पाल्याचा शैक्षणिक प्रवेश नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा असे विचार त्यांनी शेवटी मांडले.


स्कूलच्या वार्षिक कार्याचा अहवाल प्री- प्रायमरीच्या प्रिन्सिपॉल ज्योती म्हात्रे आणि प्रायमरी विभागाच्या प्रिन्सिपॉल इशिका मॅडम यांनी सादर केला कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णा शर्मा, तेजल फठानिया, भार्गवी पाटील यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


थोडे नवीन जरा जुने