दिनांक १३ मार्च २०२३ रोजी 'फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) चिरनेर,उरण' चा १७ वा वर्धापन दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.संस्थेची स्थापना १३ मार्च २००६ रोजी झाली. फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) चिरनेर,उरण संस्था ही रायगड मधील तसेच उरण- पनवेल तालुक्यात फक्त
वन्यजीवांसाठी काम करणारी पहिली संस्था आहे.स्थापनेपासून ते आजपर्यंत संस्थेच्या कार्यात अनेक समस्या,चढ-उतार आले पण त्या सर्व संकटांवर व परिस्थितीवर मात करत आपल्या सर्व सदस्यांनी मातीशी नाळ जोडून संस्थेच्या वाढीसाठी आपापल्या परिने मोलाचे योगदान दिले आहे.१७ वर्षे पूर्ण करून १८ व्या वर्षात फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) या संस्थेने पदार्पण केले आहे .
अनेक शाश्वत निसर्ग संवर्धनाच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवत फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चे काम आजही त्याच जोमाने सुरू आहे. वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या नामफलकाला संस्थेचे विवेक हुदळी यांच्या शुभहस्ते हार - नारळ वाढवून तर संस्थेचे वैद्यकीय सल्लागार व सदस्य डॉ.मनोज भद्रे आणि संस्थेचे नव निर्वाचित सदस्य जावेद अली सर (भारतीय वायुसेना,निवृत्त सैनिक) यांच्या शुभहस्ते नामफलकाचे पूजन करण्यात आले.संस्थेच्या वर्धापन दिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत ठाकूर, श्रद्धा ठाकूर,उपाध्यक्ष- राजेश पाटील,उपाध्यक्ष- गोरखनाथ म्हात्रे,सचिव - कु.निकेतन ठाकूर,सह सचिव - शेखर म्हात्रे तसेच संस्थेचे ज्येष्ठ सदस्य अविनाश गावंड,हिम्मत केणी, अनुज पाटील,प्रीतम
पाटील,निवृत्ती भोईर,पियूष म्हात्रे,राकेश शिंदे, प्रथमेश मोकल,तुषार कांबळे, ऋषिकेश म्हात्रे, प्रणव गावंड, युवराज शर्मा,प्रथमेश ठाकूर,सृष्टी ठाकूर,आयुष जाधव आदी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते.यावेळी संस्थेची जनरल सभा देखील झाली आणि त्यात संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली.
Tags
उरण