पनवेल (प्रतिनिधी) चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त)येथे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवाचे आयोजन दिनांक ११ व १२ मार्च रोजीकरण्यात आले होते. शनिवार दिनांक ११ मार्च२०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सव उत्साहाने साजरा झाला. रविवार दिनांक १२मार्च २०२३ रोजीसत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. विजय खोले, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू व महाराष्ट्राचे उच्च शिक्षण विभागाचे माजी
संचालकमा. डॉ. एस.एन.पठाण यांना आमंत्रित केले होते.या प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख,मुंबई विद्यापीठाचे माजी प्र.कुलगुरू मा. डॉ. नरेश चंद्रा, मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मा. डॉ.अजय भामरे,रुसाचेमाजी वरिष्ठ सल्लागार मा. डॉ. विजय जोशी यांची विशेष उपस्थिती लाभली.
तसेच संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मा. श्री. अनिल भगत,मा. श्री. संजय भगत, मा. सौ.राज अलोनी, मा. श्री.हरिश्चंद्र पाटील, भागुबाई चांगु ठाकूर विधी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या मा. सौ. धनश्री कदम, रामशेठ ठाकूरकॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाडत्याचबरोबर चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. पाटील,रौप्य महोत्सवी समारंभाचे समन्वयक डॉ. डी.एस.नारखेडे,कलाशाखेचे प्रमुख प्रो.(डॉ.) बी.एस.पाटील, वाणिज्यशाखेचे प्रमुख प्रो.(डॉ.)एस.बी.यादव, विज्ञानशाखेच्या प्रमुख डॉ.जे.एस.ठाकूरआणिआय. क्यू. ए. सी. विभागाचे समन्वयक प्रो. (डॉ.)बी. डी. आघाव आदी मान्यवर उपस्थित होते.
मा.श्री. रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते महाविद्यालयातील जडण घडणीसाठी मोलाचा सहभाग असणारे प्रतिष्ठित व्यक्ती, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आजी व माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे यांनीमहाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला व पाहुण्यांची ओळख करून दिली. संस्थेचे चेअरमन मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे संबोधिले की, सध्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलांची आवश्यकता आहे. त्याच दृष्टीने आम्हीमहाविद्यालयात रोजगाराभिमुख हितावह बदल केले आहेत. आपले महाविद्यालय आज मुंबई विद्यापीठात सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. या मागे महाविद्यालयातीलआणि संस्थेतील सर्वांचा मोलाचा वाटा आहे
मा. डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्था आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था एकच आहे असे उदगारले तसेचजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आपला रौप्य महोत्सव साजरा करत असताना संस्थेच्या पहिल्या महाविद्यालयाला 'स्वायत्तता दर्जा' प्राप्त होणे ही बाब म्हणजे संस्थाचालक श्री. रामशेठ ठाकूर ह्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाची आणि कुशल व्यवस्थापनेची पोचपावती मानली जात आहे. त्यांनी महाविद्यालयाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वमा. श्री. रामशेठ ठाकूर यांचा रयत शिक्षण संस्थेला खूप मोठा आधार आहे तसेच त्यांचा स्पर्श हा श्रीरामाच्या स्पर्शासारखा असे संबोधिले. प्रमुख पाहुणे मा. डॉ. विजय खोलेयांनी महाविद्यालायला पुढीलवाटचालींसाठीशुभेच्छा दिल्या आणि महाविद्यालयाचे विद्यापीठामध्ये रुपांतर होण्याची क्षमता आहे तरी सर्वांनी प्रयत्नशील राहा असे त्यांनी उद्देशुन सांगितले. मा. डॉ. एस.एन.पठाण यांनी आपल्या भाषणात असे संबोधिले की, मा. श्री. रामशेठ ठाकूर हे भारतीय संस्कृतीचा एक आदर्श आहे. शिक्षक हा महत्वाचा पैलु ज्यां
च्यामुळे हे महाविद्यालय उत्तरोत्तर प्रगती करत आहे. मा. डॉ. विजय जोशी यांनी महाविद्यालयाचे कौतुक केलेव २५ वर्षाचा कार्यक्रम असा असेल तर ५० वर्षाचा कसा असेल असे उद्दगार काढले,त्यात त्यांनी प्रभू रामचंद्राची एक खारीची सुद्धा कथा सांगितली आणि या महाविद्यालयातीलकर्मचारीहे घड्याळ विसरूनकाम करतात त्यामुळे हे महाविद्यालय प्रगती पथावर पोहोचले आहे. सरतेशेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. पाटील यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दलजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख,पनवेलचे मा. आमदार श्री. प्रशांत ठाकुर व संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
पनवेल