अर्थसंकल्पातून देश व राज्याचा सक्षम विकासाचा वेग - आमदार प्रशांत ठाकूर डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेचे अर्थसंकल्प - प्रतीक कर्पे



 





पनवेल(प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दमदार पाऊले उचलली आहेत. त्या अनुषंगाने हे जनतेचे अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य तथा मुंबई भाजपचे सचिव प्रतिक कर्पे यांनी आज (दि. १२) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 



       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘सबका साथ सबका विकास’ या तत्त्वाने सर्वसामान्यांना प्रगतीभिमुख वाटेवर नेण्याचे काम अधिक जोमाने सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. त्या अनुषंगाने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





      प्रतिक कर्पे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढे सांगितले कि, अर्थसंकल्पात शेवटच्या व्यक्तीचा विचार करताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. या अर्थसंकल्पात बऱ्याच योजना देखील लक्षवेधी ठरल्या आहेत. जगदगुरु तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन । ज्याची आस करी जन ॥’ या तत्वास अनुसरुन अर्थसंकल्प", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. ही बाब अत्यंत अभिमानास्पद अशी आहे. ‘पंचामृता’च्या माध्यमातून मांडण्यात आलेला अर्थसंकल्पात सर्वसामान्य घटकाचा प्राधान्याने विचार केल्याचे दिसते. राज्याची अर्थव्यवस्था अधिक व्यापक करण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर दिल्याचे ठळकपणे जाणवते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असून या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटी देण्यात आले आहेत.मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारली जाणार आहेत. तर शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारण्यात येणार असून शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे


.शेतकऱ्यांचा सन्मान होण्यासाठी या अर्थसंकल्पातकृषी क्षेत्रासाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी आता केवळ १ रुपयांत पीकविमा दिला जाणार आहे. याचबरोबर, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी ३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणले जाणार आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ दिले जातील. २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ दिले जातील. तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. महाकृषिविकास अभियान तसेच कोकणासाठी काजू बोर्ड बनवले जाणार आहे. याबरोबरच नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले गेले आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी १ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जाईल. शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना उपयुक्त ठरेल. एकूणच शेतकऱ्यांना थेट रोखीने आर्थिक मदत देण्यावर भर देण्यात आला आहे. ‘बोलण्यावर नाही, कृतीवर भर’ मुंबईचा सर्वांगिण विकास या न्यायानेमुंबईच्या सुशोभिकरणासाठी १ हजार ७२९ कोटी रुपये तरतूद केली आहे.







 एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण केले जातील. ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण केल्या जाणार आहेत. पुणे मेट्रोसाठी ८ हजार ३१३ कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. तर मुंबईत ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे निर्माण केले जाईल. मुंबई मेट्रो १०, ११,१२ असे नवीन प्रकल्प उभारले जातील. यातून सर्वसामान्य मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणवर भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात येत आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ मिळेल.जन्मानंतर मुलीला ५ हजार





थोडे नवीन जरा जुने