महेश निमणे लिखित व्यवसाय विक्री एकशे उपाय पुस्तकांचे शर्मिलाताई राज ठाकरे यांच्या कडून कौतुक

महेश निमणे लिखित व्यवसाय विक्री एकशे उपाय पुस्तकांचे शर्मिलाताई राज ठाकरे 
यांच्या कडून कौतुक 


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १४ मार्च, महेश निमणे यांनी लिहलेले व्यवसाय विक्री एकशे उपाय पुस्तकांचे नुकताच अनावरण करण्यात आले होते.यामध्ये व्यवसाय करण्यासाठी उत्तम अशी माहिती असल्यामुळे तरुण वर्गांचा तसेच व्यवसायामध्ये असलेले व्यापारी हे पुस्तक खरेदी करून वाचन करीत आहे.यामुळे वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्यांचा पाहावयास मिळत आहे.नुकताच श्रमिक गड खालापूर या कार्यालयाचे अनावरण सोहळ्यास शर्मिलाताई राज ठाकरे उपस्थित होत्या,यावेळी त्यांनी महेश निमणे यांच्या व्यवसायीकांचे व विक्री एकशे उपाय पुस्तकांचे कौतुक केले.मराठी माणसांच्या हातामध्ये हे पुस्तक मिळाल्यास त्यास व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळेल असे शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केल्यांचे महेश निमणे यांनी प्रतिनिधी बोलतांना सांगितले.               गेले दोन ते तीन वर्ष अथक प्ररिश्रम करून हे पुस्तक नव तरुण व्यवसायामध्ये प्रदारपण करतात त्यांच्या साठी लिहले गेलेले आहे.हे पुस्तक मराठी माणूस व्यवसाय आपले कौशल्य या पुस्तकाच्या माध्यमातून सत्यात निर्माण करू शकतो. कारण यामध्ये व्यवसाय कसा करावा आणि त्यांचे उदाहरण समवेत स्पष्टीकरण करण्यात आले आहे.यामुळे या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे.यामुळे प्रत्येकांनी हे पुस्तक वाचनांचे अवाहन निमणे यांनी केले आहे.


                   शर्मिलाताई राज ठाकरे यांनी हे पुस्तक हातामध्ये घेतात.यामध्ये नक्कीच तरुण व्यवसायिकांसाठी अनमोल ठरेल या मध्ये शंका नाही.कारण या पुस्तकाचे शिर्षक याव्यवसायीकांचे एकशे उपाय असे असल्यामुळे मी हे पुस्तक आवर्जून वाचेल असे महेश निमणे यांस सांगितले.हे पुस्तक त्यांच्या कडे सुपुर्त करतांना मला मनस्वी आनंद होत असल्याचे महेश यांनी सांगितले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा हे पुस्तक त्यांच्या कडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले


थोडे नवीन जरा जुने