जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, शुक्रवारी पनवेल येथील फडके नाट्यगृहात खेळ रंगला पैठणीचा


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, शुक्रवारी पनवेल येथील फडके नाट्यगृहात *खेळ रंगला पैठणीचा* या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रिया इव्हेंट्स आणि बीबी बांठिया प्रस्तुत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून "महाराष्ट्राची हास्यजत्रा" फेम प्रसिद्ध अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित होत्या तरी याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अर्धांगिनी वर्षा ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या अर्धांगिनी ममता म्हात्रे टुरिझम ग्लोब क्वीन हर्षला तांबोळी, "तू चाल पुढं" या झी मराठीवरील मालिकेतील अभिनेत्री प्रतिभा गोरेगावकर,


 नगरसेवक राजू सोनी, प्रथमेश सोमण शिवसेना महानगरप्रमुख, बीबी बांठिया ज्वेलर्सचे मॅनेजिंग पार्टनर गौरव बांठिया, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज, कुसुम पाटील, श्रुती श्याम म्हात्रे, रितू राजेश डोंगरे, स्पर्श हॉस्पिटलचे प्रतिनिधी स्वप्निल म्हात्रे, द्वारकाधीश साडी सेंटरचे मालक वीरेंद्र जगे, दैनिक पुण्यनगरीचे संपादक राजेश खेडेकर , रेड विंगस हॉटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर सौ प्रतिभा सूर्यवंशी, चितळे एक्सप्रेसच्या वतीने भक्ती कर्वे मॅडम,राजश्री सोनी, नाट्यनिर्माते तथा मंदार काणे एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा मंदार काणे, माधुरी गोसावी, रमेश आंग्रे, प्रदीप आंग्रे ,मधुसूदन साखरे इत्यादी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना रसिका वेंगुर्लेकर यांनी महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याकरता प्रयत्न करायला हवे असे आवाहन केले त्यापुढे म्हणाल्या की आपण महिला कामाच्या निमित्ताने किंवा नोकरी धंद्याच्या निमित्ताने जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो. ज्यायोगे आपण पैठणी सारखी गोष्ट सहज खरेदी करू शकतो. मात्र खेळातून एखादा पुरस्कार किंवा एखादी गोष्ट जिंकणे यासारखा आनंद नाही, कारण त्या बक्षिसाचं मोल मोठं असतं. त्यामुळे बक्षीसाबरोबरच आत्मसन्मानासाठी सुद्धा खेळावं, असं आवाहन रसिका वेंगुर्लेकर यांनी केलं.
यावेळी सुप्रसिद्ध गायक आणि निवेदक हरीश मोकल यांच्या खुमासदार निवेदनाने नटलेल्या "खेळ रंगाला पैठणीचा" या कार्यक्रमादरम्यान महिलांनी पैठणीच्या खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटला.

 पैठणीच्या या खेळामध्ये तब्बल 300 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये अंतिम फेरीमध्ये आठ महिलांनी प्रवेश केला होता. सुरशीच्या या खेळामधील शेवटच्या या आठ पैकी अंतिम तीन जणींना अनुक्रमे मीनाक्षी पाटील (पहिली), सुनिता कुडवे (दुसरी) आणि कांचन गडकरी (तिसरी) अशा मानाच्या पैठण्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. यावेळी नाट्यगृहात उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. या लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या पाच महिलांना देखील पारितोषिकांच्या रुपात पाच पैठण्या प्रदान करण्यात आल्या. याशिवाय प्रेक्षक महिलांनासुद्धा उखाण्यांसाठी विशेष भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी उपस्थित महिलांनी हरीश मोकल व सुवर्णा मातोंडकर यांनी गायलेल्या गाण्यांवर ठेका धरला 


व क्षणभर सगळ्या चिंता बाजूला सारून मनमुरादपणे नृत्य करत गाण्यांचा आनंद लुटला.
एकूणच कार्यक्रमाचे आयोजक प्रिया इव्हेंट्सचे सर्वेसर्वा रसिक आंग्रे यांनी महिलांच्या मनोरंजनामध्ये कोणत्याही प्रकारची कसर ठेवली नाही. 
कायम संसाराच्या राम रगाड्यात अडकलेल्या महिलांच्या जीवनामध्ये आनंदाचे काही क्षण फुलवण्याचा प्रयत्न. "खेळ रंगला पैठणीचा" या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.


थोडे नवीन जरा जुने