श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रेक्षा चंद्रकांत देशमुख यांना दोन लाख रुपयांची मदत





पनवेल(प्रतिनिधी) वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गव्हाण गावातील प्रेक्षा चंद्रकांत देशमुख यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. 


          सदरचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते प्रेक्षाचे वडील चंद्रकांत देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यलयीन व्यवस्थापक अनिल कोळी, के. जी. म्हात्रे, निश्चल कोळी उपस्थित होते. 


         सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या २५ पेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. प्रेक्षा देशमुख या धुळे येथील एसीएम महाविद्यालयात एमबीबीएस द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. 


थोडे नवीन जरा जुने