पनवेल(प्रतिनिधी) आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार उरण विधानसभा मतदार संघासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये १४७.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रामुख्याने हा निधी रस्त्यांच्या विकासासाठी आहे. यामध्ये ग्रामीण मार्गाकरिता ४७. ५० कोटी, प्रमुख जिल्हा मार्गासाठी ५८ कोटी, कोन-सावळे रस्त्याच्या उर्वरित कामासाठी २० कोटी रुपये तर दांड- तुराडे रस्त्यासाठी १९ कोटी रुपये, तसेच गुळसुंदे-जांभिवली-कराडे रस्त्यासाठी ०३ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल आमदार महेश बालदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले.
आमदार महेश बालदी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार झाल्यानंतर या मतदार संघाचा झपाटयाने विकास झाला. मागील दोन टर्मच्या तत्कालीन आमदारांकडून कोन सावळे रस्ता खड्ड्यातच सापडला होता. मात्र आमदार महेश बालदी यांनी तात्काळ या विषयात लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावला. आता दांड तुराडे रस्त्याचाही विकास होणार आहे, त्यामुळे प्रवासी, वाहनचालक यांना मोठा दिलासा मिळून इंधनाचीही बचत होणार आहे.
Tags
पनवेल