क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे महिला दिनी महिलांच्या विविध समस्यांबाबत तहसीलदार यांना निवेदन.




पनवेल दि.०९ (वार्ताहर): पनवेलमधील अन्यायग्रस्त,पीडित, बेरोजगार महिलांच्या मदतीला नेहमीच तत्पर असणारी संस्था क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन हे नाव पनवेलसह रायगडमध्ये परिचित आहे, ही संस्था सतत महिलांच्या सोबत काम करत असून त्यांच्या अडीअडचणीला धाव घेत असते.



              महाराष्ट्रसह पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी महिला व मुलींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार करणाऱ्या आरोपीना कडक शिक्षा व त्वरित कारवाई होणेबाबत आज महिलादिनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना निवेदन देण्यात आले. सध्या देशांमध्ये कुठेही महिला व मुली सुरक्षित नाहीत. अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारावर त्वरित कारवाई होत नाही.


 वय वर्ष 3 ते 60 वर्षाच्या वयोवृद्ध स्त्रियांवरही खुलेआम अत्याचार करून हत्या करण्यात येत आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली दिसत नाही, तरी अशा प्रकरणात आळा घालण्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेण्यात यावे पनवेल या ठिकाणी मुलीवर गॅंगरेप करून हत्या करण्यात आल्या व तीन वर्षाच्या लहान चिमुरडीवरही बलात्कार हा प्रकार घडला आहे अश्या नराधमांना व आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी असे या निवेदनाद्वारे पत्र देण्यात आले,व त्या वेळी तहसीलदार साहेबांच्या सोबत महिलांच्या समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली.पत्र देतेवेळी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.रूपालिताई शिंदे सौ.रत्नमाला बा


थोडे नवीन जरा जुने