पोलिसांच्या तत्परतेमुळे सोन्याचे दागिने मूळ मालकास मिळाले परत


पनवेल दि.०९(वार्ताहर): खारघर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सोन्याचे दागिने मूळ मालकास अवघ्या चोवीस तासात परत केल्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.          खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांचे पथक गस्त घालीत असताना सेक्टर 7 येथील शॉप नंबर 15 मधील अमाम एनक्लावे मेडिकल दुकानामध्ये काम करणाऱ्या मुलीला दोन ते तीन इसम मद्य पिऊन त्रास देत असल्याने पोलीस मदतीसाठी कॉल खारघर पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील व पोलीस कॉन्स्टेबल राहुल ढावरे हे पोलीस तात्काळ मदतीसाठी घटनेस्थळी पोहोचले यावेळी त्या ठिकाणी काम करणारा मुलगा सुधीर पासवान याचे दाजी रवी कागडा यांचा घरातील किरकोळ स्वरूपाच्या वादावरून दारू पिऊन सदर मुलास शिवीगाळ करत होते असे त्या कामगार मुलांनी पोलिसांना सांगितले


. त्यानंतर रवी काकड हा सेक्टर 35 येथून निघून गेले व तेथे जाऊन देखील सुधीर पासवान याचेशी झटापट केली असता यावेळी रवी कागडा यांच्या गळ्यातील सोन्याची चैन झटापटीमध्ये पडली होती. ती चैन बिट मार्शल हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील व पोलीस कॉन्स्टेबल राहुल ढावरे यांना मिळून आली होती. यावेळी याबाबतची माहिती त्या पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांना दिली. त्यावेळी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली ही सोन्याची चैन रवी कागडा यांची पत्नी इंदू कागडा यांच्या ताब्यात देण्यात आली.थोडे नवीन जरा जुने