शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी लोकार्पण

पनवेल दि.१० (वार्ताहर) : खारघरमधील नागरिकांच्या सेवेसाठी शिवसेना खारघर शहर संघटक इम्तियाज शेख आणि पनवेल महानगरपालिका महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी शिवसेना पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे लोकार्पण मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या हस्ते शनिवार ११ मार्च रोजी करण्यात येणार आहे.  
 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे काम करत आहे.


 नागरिकांच्या सोयीसाठी पक्षाचे जनसंपर्क कार्यालय असावे याहेतूने शिवसेना खारघर शहर संघटक इम्तियाज शेख आणि पनवेल महानगरपालिका महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी खारघर सेक्टर ३५ मधील एस बी आय बँक जवळ महावीर हेरिटेज येथे पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उदघाटन शनिवार ११ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेनेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना पनवेल विधानसभा जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.थोडे नवीन जरा जुने