मातोश्रींच्या पुण्यस्मरणा निमित्त रुग्णवाहिका लोकार्पण,

 




मोफत घर हस्तांतर व स्त्री सन्मान पुरस्कार  
महेंद्रशेठ घरत यांचे अलौकीक कार्य 
 मातोश्री यमुनाबाई घरत यांच्या ९ व्या पुण्यस्मरणानिमित्त दानधर्म साठी आघाडीवर असलेले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी सिडको बुलडोझर मुळे बेघर झालेले शेलघर गावचे प्रकाश भगत यांना स्वखर्चाने दोन महिन्याच्या आत नवीन घर बांधून दिले व त्याचे हस्तांतरण ११ मार्च रोजी होत आहे. शेलघर गावच्या प्रकाश भगत यांचे वडिलोपार्जित घर हे सेक्टर १७ मधील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी होते तर एक बाजू सिडको उलवे - खाराकोपर मास हाऊसिंग मध्ये अडकली होती. गेली १० ते १२ वर्ष यामुळे मुख्य रस्त्याची एक बाजू बंद होत असल्यामुळे गावासमोर अपघात होत होते व वाहतूक कोंडी होत होती



 . अनेक वर्ष अतिक्रमण विभागाने नोटीस पाठवून कारवाई होत नव्हती, शेवटी सिडकोचे अधिकारी महेंद्रशेठ घरत यांना भेटले त्यांनी याच्यात मध्यस्थी करून घर खाली करून रस्ता बनवून देण्याचे आश्वासन दिले. जनतेचे हि काम झाले पाहिजे व प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळाला पाहिजे या भावनेने मार्ग काढला परंतु, सिडको घरांसाठी अनुदान द्यायला तयार होत नव्हती , खरे तर MMRDA - MTHL रस्त्यांसाठी विस्थापित होत असलेल्या गव्हाण गावातील ७ कुटुंबाना महेंद्र घरत यांनी MMRDA च्या पनवेल मास हाऊसिंग मध्ये प्रत्येकी २ ( 1 RK ) मिळवून देण्याचा ऐतेहासिक निर्णय पहिल्या वेळी सिडकोच्या इतिहासात २०२० मध्ये करून देण्यात यशस्वी झाले. आत्तापर्यंत सिडको महामंडळाने हजारो घरांवर बुलडोझर फिरवला परंतु विमानतळ बाधित सोडल्यास एकही घराला मोबदला दिला नाही.


 शेवटी कामगार नेते महेंद्र घरत यांनी ठरविले की एक गरीब बेघर होऊ नये म्हणून स्वखर्चाने घर बांधून देण्याचे ठरविले तो पर्यंत त्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था आपल्या स्वखर्चातून केली व आज तो सुवर्णक्षण येत आहे प्रकाश भगत यांना स्वतःचे घर मिळत आहे. 
 त्याचबरोबर यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून नोव्हेंबर मध्ये उलवे नोड वासीयांसाठी रुग्णवाहिका तर मातोश्रींच्या स्मृतीदीनी अंत्यविधी सेवा संस्था पनवेल हि संस्था मागील १५ वर्षापासून बेवारस गरीब,गरजू ज्यांची मुले परदेशात राहतात अशा आजवर एक हजारांच्या वर बेवारस मृत व्यक्तींचे अंत्यविधी केलेल्या व आजवर ५५ पुरस्कार प्राप्त केलेल्या अंत्यविधी सेवा संस्थेला रुग्णवाहिका सुपुर्त करत आहेत. संस्थेतर्फे हि आठवी रुग्णवाहिका लोकार्पण होत आहे.
 तसेच समाजातील शैक्षणिक सामाजिक क्रीडा, राजकीय व कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवरत्न महिलांचा यमुना स्त्री सन्मान पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला जात आहे.



थोडे नवीन जरा जुने