खात्यातून केले ८५ हजार लंपास

पनवेल दि १० (वार्ताहर) : एका इसमाच्या खात्यातून ८५ हजार रोख रक्कम लंपास झाल्याची घटना खारघर मध्ये घडली आहे

         खारघरमध्ये राहणाऱ्या मनू सिंग यांच्या मोबाइलवर केवायसी अपडेट करण्याचा संदेश आला. या आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यावरील फॉर्म भरून आलेला ओटीपी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीला सांगितला. यानंतर काही वेळेत त्यांच्या मुलाच्या बँक खात्यामधून ८५ हजार ५११ रुपये काढण्यात आले. या ऑनलाइन फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


थोडे नवीन जरा जुने