इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीच्या सी. एस.आर.फंडातून गावठाण, जांभूळपाडा ,चिरनेर आदिवासीं आश्रम शाळांना केले सहा संगणक संच वाटप !
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )भारतीय तेल व्यवसाय क्षेत्रात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटवणारी कंपनी अर्थात इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड या कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पोंशिबीलीटी म्हणजेच सी. एस.आर.फंडातून आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईवर यांच्या प्रयत्नातून सामाजिक दायित्व जपतं उरण तालुक्यातील गावठाण , जांभूळपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि चिरनेर आदिवासीं आश्रम शाळा या तीन शाळांना प्रत्येकी दोन असे 6 ( सहा )संगणक (कंप्युटर )भेट स्वरूपात देण्यात आले.


     
 परमानंद पाटील यांच्या माध्यमातून केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी तसेच इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड या कंपनी व्यवस्थापन कमिटीचे एच.आर.पी.आर.हेड मिलिंद मोघे,संदीप काळे आणि त्यांची टीम यांच्या कार्य तत्परतेतून आणि या कंपनीच्या सहकार्याने तीन शाळांना मोफत सहा संगणक संच देण्यात आले. ज्यांचा उपयोग त्या शाळांतील गरीब - गरजूवंत आदिवासीं विद्यार्थी वर्गाच्या शालेय जीवनातील उज्वल भविष्याकरिता होणार आहे.

     चिरनेर आदिवासीं आश्रम शाळा येथे या आदर्शवत कार्यक्रमाचे अगदी सुंदर असं आयोजन केलं गेले.या कार्यक्रम प्रसंगी चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच आणि जेष्ठ उद्योजक सुधाकर पाटील,वेश्वी गावचे माजी सरपंच युवा सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रशेठ मुंबईकर, आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रायगड भूषण भारतदादा भोपी,इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेडचे एच.आर. पी.आर.हेड मिलिंद मोघे,प्रफुल्ल म्हात्रे मॅडम, संदिप काळे, मुकेश इंदुलकर, परमानंद पाटील,आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत, कॉन संस्थेचे वेश्वी शाखा उपाध्यक्ष सुरेन्द्र पाटील उपस्थित होते.या आदर्शवत प्रेरणादायी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक आणि समालोचक राजेंद्र पाटील यांनी आपल्या ओघावत्या भाषाशैलीत करून उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले.
      इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड या कंपनीच्या सी.एस.आर.फंडातून संगणक वाटप कार्यक्रमात गावठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आदर्श शिक्षिका राजश्री मुंबईकर व शिक्षक प्रल्हाद नवाळे, जांभूळपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आदर्श शिक्षिका उज्वला पाटील, तसेच चिरनेर आदिवासीं आश्रम शाळेतील शिक्षक मोरे सर,शिंदे मॅडम यांच्या कडे कार्यक्रमा करिता उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सहा संगणक प्रदान करण्यात आले सोबतच चिरनेर आदिवासीं आश्रम शाळेतील संगणक वर्गाचे उद्घाटन करून संगणक कक्षात इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीचे एच.आर.पी.आर.हेड मिलिंदजी मोघे यांनी नवीन संगणक सुरू करून संगणकाच्या स्क्रीनवर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उज्वल भविष्या करिता शुभेच्छा देखील दिल्या. सर्व मान्यवरांच्या आणि आश्रम शाळेतील शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत हा अनोखा आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.


थोडे नवीन जरा जुने