महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या म्हसळा तालुका अध्यक्षपदी रमेश पोटले यांची नियुक्ती

पनवेल / प्रतिनिधी                   
महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. स्थापना झाल्यापासूनच अध्यक्ष केवल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनच्या कामाला सुरुवात झाली. जिल्ह्यात तालुका स्तरावर काम करण्यासाठी अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते हे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधत आहेत. पत्रकार यांच्यावर होणारे अन्याय, शासन दरबारी गोरगरीब यांची होणारी गळचेपी, समाजात भेडसावणाऱ्या समस्या यासाठी ही संघटना कार्यरत असुन विविध लोकपयोगी कार्यक्रम राबवण्यात नेहमी अग्रेसर असणारी पत्रकारांची संस्था म्हणून नावलौकिक मिळवत आहे. जेष्ठ सल्लागार दीपक महाडिक, कार्याध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष सुनिल पाटील व सचिव संतोष सुतार यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रभर संघटना बांधणी सुरु आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन म्हसळा तालुका अध्यक्षपदी सतरा वर्षांचा अनुभव असणारे म्हसळा टाइम्सचे संपादक रमेश पोटले यांची नियुक्ती पनवेल शासकीय विश्राम गृहात छोट्याखानी कार्यक्रमात करण्यात आली. अध्यक्ष केवल महाडिक व सर्व पदाधिकारी यांच्या मताने हि निवड करण्यात आली असून अध्यक्ष यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व सचिव यांनी त्यांचे स्वागत केले. 


अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करुन संघटना वाढवण्यावर भर देणार असल्याचे तसेच लवकरात लवकर म्हसळा तालुका कमिटी तयार करून कामाला सुरुवात केली जाईल असे पोटले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले व निवडीबद्दल अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे आभारही मानले.थोडे नवीन जरा जुने