सरस्वती कॉलेज चा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीत धिंगाणा, अश्लील चाळे ,मारामारी ,दुचाकी स्वारांची स्टंट बाजी ,


पनवेल / प्रतिनिधी
 सरस्वती कॉलेज खारघर च्या विध्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये आयोजित केल्या होत्या चक्क बारावी बोर्डाच्या वेळेस डी जे लावून या क्रीडा स्पर्धा चे आयोजन केल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली होती वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून परीक्षेच्या वेळेत स्पर्धा थांबल्या मात्र पेपर ची वेळ संपल्यानंतर मैदानात धिंगाणा सुरु असल्याने अकॅडमीत जिम ,बॅडमिंटन स्विमिंग अशा विविध ठिकाणी मेंबर असलेल्या लहान पासून वियोवृद्धाना सरस्वती कॉलेज च्या बेशिस्तपणाची शिकवणं दिसली ,या बाबतीत संचालक मंडळाला विचारणा केली असता आम्ही कोणतीही परवानगी क्रीडा स्पर्धा करीता दिली नसल्याने मग अशा स्पर्धा कोणाच्या आशीर्वादाने आदेशाने झाल्या कोणतीही परवानगी नसताना अशा स्पर्धा बोर्डाच्या परीक्षेत घेतल्याने सरस्वती कॉलेज वर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे .कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये विविध क्रीडा पटू घडवण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरु आहे या अकॅडमीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्विमिंग पूल ,यासह फिटनेस सेंटर ,बॅडमिंटन कोर्ट अशा विविध क्रीडा प्रकारातून खेळाडू घडवण्याचे काम कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी घडवत असते .याच कॅम्पस मध्ये कॉलेज देखील आहे ,बारावी बोर्डाचे सेंटर असलेल्या या भागात परीक्षेच्या वेळेत जमाव बंदी म्हणजेच कमल १४४ लागू आहे . असे असताना देखील अकॅडमीच्या मैदानात बारावी परीक्षेच्या पेपर च्या वेळेत सरस्वती कॉलेज खारघर च्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. डी जे चा धिंगाणा विद्यार्थ्यांमधील हाणामारी ,बेशिस्तपणा याची झलक पालक आणि कर्नाळा स्पोर्स्टस अकॅडमी मध्ये येणाऱ्या पनवेल वासियांना झाली .


रात्री उशिरा पर्यंत सुरु असलेल्या या स्पर्धेत सहभागी घेतलेल्याला विधार्थी विधार्थिनीनी अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली तर काही बाईक रायडर ने स्टंटबाजी करत युवतींना भुरळ घालायचा प्रयत्न केले तर काही चारचाकी चालकांनी तर संध्याकाळी अकॅडमी मध्ये चालायला आलेल्या महिलांच्या अंगावर गाडी नेली यावरून दिवसभर विध्यार्थ्यांना त्रास आणि संध्याकाळी अकॅडमी चे सभासद असलेल्या नागरिकांना त्रास झाल्याने त्यांनी संचालक मंडळाला विचारणा केली असता आम्ही सरस्वती कॉलेज च्या या क्रीडा स्पर्धेला परवानगी दिली नसल्याचे संचालक मंडळाकडून सांगण्यात आले . संचालक मंडळाची कोणतीही परवानगी नसताना अशा विनापरवाना स्पर्धा आणि काही अक्टव्हिटी अकॅडमीमध्ये कोण करते याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे अन्यथा या ठिकाणी अनुसूचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक करीत आहेत .  थोडे नवीन जरा जुने