भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवानेते प्रतीक देवचंद बहिरा यांच्या वतीने महा रोजगार मेळावा






भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवानेते प्रतीक देवचंद बहिरा यांच्या वतीने महा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.


 आपल्या शहरातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी मिळाव्यात या उद्देशाने भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवानेते प्रतीक देवचंद बहिरा यांनी रविवार सकाळी 10 ते दुपारी 4 या दरम्यान तक्का मराठी शाळा, पनवेल येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उदघाटन पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. 



यावेळी पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, देवचन बहिरा, प्रभाकर बहिरा, मनोज भुजबळ, माजी नगरसेविका चारुशीला घरत, आयोजक प्रतीक बहिरा, हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने