घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी केली अटक





पनवेल दि.०६ (संजय कदम) : डोंबिवली परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन राबवत घरफोडी करणाऱ्या सराईत व अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



डोंबिवली परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनिरी दत्तात्रय सानप, सपोनि सुनिल तारमळे, सपोनिरी अविनाश वनवे, सपोनिरी सुरेश डांबरे, सपोउपनिरी भानुदास काटकर यांच्यासह पोलीस पथक संपूर्ण डोंबिवली शहरात पेट्रोलिंग करीत असताना मानपाडा सर्कल ते उसरघर या निर्जन रस्त्यावरून आरोपी सरुद्दीन ताजुद्दीन शेख (वय ३२, रा. मुंब्रा) आणि महम्मद जिलानी इसा शहा (वय ४०, रा.मुंबई) हे पोलिसांना बघताच मोटारसायकल सोडून पळून जाऊ लागले. त्यांचा चोरीचे कामी संशय आल्याने पोलिसांनी सदर दोन्ही इसमांचा पळत पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मानपाडा, टिळकनगर, डोंबिवली, विष्णुनगर पोलीस ठाणे तसेच ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच ते घरफोडी चोरी करणेसाठी मुंब्रा येथुन डोंबिवली शहरात येत असल्याची माहिती दिली



. पोलिसांनी त्यांच्याकडून १२ घरफोडी गुन्ह्यातील ३५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ६२० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण २१ लाख ९४ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांचेविरुध्द आणखी काही गुन्हे दाखल आहेत काय याचा तपास मानपाडा पोलीस करीत आहेत. 




थोडे नवीन जरा जुने