कामोठे मध्ये मालमत्ता करा विरोधात महाविकास आघाडी आक्रमक


मालमत्ता कराच्या नोटीस नागरिकांना पाठवल्या नंतर पहिल्यांदा कामोठे मध्ये पनवेल पालिके विरोधात विराट मुक मोर्चा काढून कामोठेकरांनी तीव्र विरोध दर्शवला होता.
आयुक्तांना हजारो पोस्ट कार्ड पाठवणे, मालमत्ता कराची होळी करणे अशा प्रकारे शांतीच्या मार्गाने विरोध सुरूच होता मात्र तरीही पालिकेने दुर्लक्ष केले. त्यासाठी महाविकास आघाडीने 13 मार्च रोजी महा मोर्चाचे भव्य आयोजन केले आहे. त्याचाच जनजागृती साठी पुन्हा महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. त्यासाठी रविवारी (दिनांक 5) प्रत्येक सेक्टर मध्ये मा.आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हा जिझया कर आम्ही कमी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे गर्जना केली. तसेच मा. नगरसेवक गणेश कडू यांनी हा कर कशा प्रकारे जाचक आहे याची माहिती दिली. त्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील,काँग्रेस नेते आर.सी.घरत, शेकाप पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील साहेब, शेकाप पनवेल मनपा जिल्हा चिटणीस गणेश दादा कडू, काँग्रेस पनवेल जिहाध्यक्ष सुदाम पाटील, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, माजी नगरसेवक प्रमोद भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजकुमार पाटील, गौरव पोरवाल,सुनील भेंडे, अमोल शितोळे,अल्पेश माने,संगीता राऊत, स्वप्नील काटकर सचिन त्रिमुखे, प्रभाकर गोवारी, संतोष चीखलकर, अनंत वारे, किशोर मुंडे, पोपटराव आवारी, संगीता राऊत, कुणाल भेंडे, उषा झणझने यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या अ वर्गाच्या महापालिका पेक्षा ड वर्गातील पनवेल पालिकेचा कर जास्त आहे. करोना काळात झालेली आर्थिक हानी अजुन भरून निघाली नाही याचा भावनिक विचार पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने करण्यास हवा अशी भावना शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल मुकूंद शितोळे यांनी व्यक्त केली.


थोडे नवीन जरा जुने