सोनारावर चाकूहल्ला करणाऱ्यास जागृत नागरिकांनी पकडले
पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सोनारावर चाकूहल्ला करून दागिने घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमास जागृत नागरिकांनी पकडल्याची घटना पनवेल जवळील खांदा वसाहतीमध्ये घडली आहे .                      सुखविंदर जसबीरसिंग धामी (३२) या लुटारुचे नाव असून मुकेश जैन यांचे खांदा कॉलनीत विजयश्री नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. आरोपी सुखविंदर धामी हा जैन यांच्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला होता. यावेळी त्याने सोन्याच्या तीन चेन पसंत केल्यानंतर दागिने घेऊन पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला


. त्यामुळे जैन यांनी त्याला अडवल्यानंतर त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तो सोन्याच्या तीन चेन घेऊन पळून जात असताना जैन यांनी आरडाओरड केली. त्यामुळे भागातील नागरिकांनी सुखविंदरला पकडून बेदम मारहाण केली व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे .


थोडे नवीन जरा जुने