जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गिरविले मौखिक आरोग्याचे धडे







पनवेल दि.२१(संजय कदम): हृदय, मूत्रपिॅड, फुफ्फुस आणि यकृत यांच्याप्रमाणेच प्रत्येकाने आपल्या मौखिक आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होणे , दात किडणे, हिरड्यांच्या समस्या आणि तोंडाच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी, मेडिकव्हर हॉस्पिटल्सने खारघर सेक्टर १० येथील लिटल मिलेनियम प्रीस्कूलमधील 90 हून अधिक विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांना नियमित दात घासणे आणि मौखिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.


     मौखिक आरोग्य उत्तम राखणे ही एक चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दातांची आणि हिरड्यांची काळजी न घेतल्यास भविष्यात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. दातांची वेळोवेळी काळजी न घेणाऱ्या लोकांमध्ये दात आणि हिरड्यांचे आजार तसेच हृदयविकार आणि मधुमेहासारखे आजार दिसून येतात. हिरड्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास दातांमध्ये पोकळी निर्माण होणे तसेच दातांचा संसर्ग आणि पीरियडॉन्टायटीस सारख्या समस्या होऊ शकतात. दातांची काळजी योग्यरित्या काळजी न घेतल्यास दातांमधे वेदना होतात आणि लवकर दात खराब होतात. मौखिक आरोग्य ही एक चिंतेची बाब ठरत आहे. मौखिक अस्वच्छतेमुळे श्वासाची दुर्गंधी, दातांमधील संवेदनशीलता, तुटलेले दात आणि दंतरोग, अकाली दात पडणे आदी समस्या उद्भवतात असे डॉ राहुल चौबे, दंत चिकीत्सक, मेडिकव्हर हॉस्पिटल्सने स्पष्ट केले. डॉ दीपक खन्ना, दंत चिकित्सक, मेडिकव्हर हॉस्पिटल्स यांनी सांगितले की, शाळेतील मुलांमध्ये मौखिक आरोग्याविषयी जनजागृती करणे हा आमचा मुख्य उद्देश होता.



 या उपक्रमातंर्गत आम्ही सुमारे 90 विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्याची तपासणी केली. त्याचबरोबर दातांची निगा कशी राखावी, दिवसातून दोन वेळा ब्रश करणे, फ्लोराईड टूथपेस्ट वापरणे, खाल्लानंतर चूळ भरणे या चांगल्या सवयीं विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. आपल्या आहारात ताजी फळे आणि भाज्या यांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला. दर 6 महिन्यांनी दंत तपासणी करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. पालकांनी मुलांच्या मौखिक आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.



थोडे नवीन जरा जुने