कारची काच फोडून लॅपटॉपसह रोख रक्कमेची चोरी


कारची काच फोडून लॅपटॉपसह रोख रक्कमेची चोरी
पनवेल दि.२२ (वार्ताहर) : रस्त्यावर पार्क केलेल्या कारची काच फोडून कारमधील दोन लॅपटॉप, रोख रक्कम चोरून नेल्याची घटना कळंबोली वसाहत परिसरात घडली आहे. 

 कामोठे येथे राहणारे दिलीप तिवारी कामानिमित्त सिडको कार्यालयात गेले होते. तेथील काम संपवून ते कळंबोलीतील वरुण रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले. या दरम्यान त्यांनी त्यांची कार किरवली चौक ति स्टील मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभी केली होती. चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून आतमधील दोन लॅपटॉपसह रोख रक्कम चोरून नेली.


थोडे नवीन जरा जुने