एक लाख 21 हजारांचे लोखंडी रिंग गार्डर चोरणारे दोन सराईत गजाआड
पनवेल दि.०६ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील वावंजे येथील एका गाळयात ठेवलेल्या एक लाख एकवीस हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना गजाआड केले असून त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

  
              वावंजे येथील एस मेक इंजीनियरिंग वर्क्स, गाळा नंबर ई, आठ- नऊ, वावंजे येथील गाळ्यात ठेवलेला एक लाख 21 हजार रुपयांचे लाल रंगाच्या लोखंडी रिंग गार्डरचे साडेनऊ फुटाचे वीस तुकडे चोरट्याने गाळ्याच्या लोखंडी गेटला लावलेले कुलूप तोडून चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक संजय गळवे, पोहवा धुमाळ, पोहवा कुदळे, पोहवा मेहेर, पोशि भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध घेत असताना आरोपी सैजाद उर्फ बटला इस्माईल शेख (वय २७, रा.वावंजे गाव) आणि सगीर अब्दुल अजिज शेख (वय ३१, रा. वावंजेगाव) हे दोघे दोन टेम्पोमध्ये मालभरून कळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्सच्या मागे असल्याची माहिती या पथकाला मिळताच त्यांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना २ टेम्पोसह ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
थोडे नवीन जरा जुने