सराईत अंतराज्य घरफोडी करणारे आरोपी जेरबंद; वाशी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी






पनवेल दि.०६ (संजय कदम) : घरात कोणी नसताना घरातील सोने, हिरे व इतर मौल्यवान व रोख रक्कम असा एकूण नव्यान्नव लाख पंच्यान्नव हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करून नेल्याची घटना वाशी सेक्टर ६ येथे घडली होती. याप्रकरणी वाशी पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तसेच तांत्रीक तपासा वरून ४ आरोपींना उत्तप्रदेश व मध्यप्रदेश येथून अटक केली आहे. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थान हया राज्यात पन्नास पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. 



                   वाशी पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर ६ मधील 'रो हाऊसमध्ये' घरात कोणी नसताना कोणीतरी अज्ञात इसमाने रो हाउसचे गिल तोडून घरातील सोने, हिरे, व इतर मौल्यवान व रोख रक्कम असा एकूण नव्यान्नव लाख पंच्यान्नव हजार रुपये किंमतीचा माल घरफोडी चोरी करून नेला. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत तायडे, पोउपनि निलेश बारसे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवा श्रीकांत सावंत, पोहवा विनोद वारींगे, पोहवा सुनिल चिकणे, पोना चंदन म्हसकर, पोना संदीप पाटील,पोना ठाकुर, पोना गोकुळ ठाकरे, पोना अमोल राठोड, पोशि किशोर डगळे, पोशि अमित खाडे आदींच्या पथकाचे ३ वेगवेगळी पथके तयार करून घटनास्थळावरील मिळालेले पुरावे, सीसीटिव्ही फुटेज तसेच तांत्रीक तपासाद्वारे आरोपी आशीष उर्फ सुरज जिलेदार सिंग (वय ३२, रा. उत्तरप्रदेश), राजकुमार लालबहादुर सिंग ठाकुर (वय ४२, रा. उत्तरप्रदेश), राजकुमार रामकुमार पांचाळ (वय ४३, रा.मध्यप्रदेश) आणि पुजा अंकुश जाधव (वय ३२, रा.मध्यप्रदेश) यांना उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशमधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांचेकडून पोलिसांनी गुन्हयातील चोरलेल्या



 मालमत्तेपैकी १३ लाख ५० हजार ५०० रूपये रोख रक्कम, ८ लाख रूपयांचे अमेरीकन डॉलर्स, १ लाख १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असे एकुण २२ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलीस ठाण्यास दाखल असलेले आणखी ८ गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये ७ लाख ५२ हजार रूपये किंमतीची मालमत्ता अशाप्रकारे एकुण ९ गुन्हयात मिळुन ३० लाख सतरा हजार रूपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. याव्यतिरीक्त खांदेश्वर, सीबीडी, कल्याण परिसरातील तीन गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर त्यांचे साथीदार एजाज अब्दुल करीम चौधरी, आनंद राजु पिल्ले उर्फ रजवा यांचा शोध वाशी पोलीस घेत आहोत. 



थोडे नवीन जरा जुने