हत्याराचा धाक दाखवुन हायवे रॉबरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात मुंब्रा पोलीसांना यशपनवेल दि.०६ (संजय कदम) : मुंब्रा बायपास रोडवर रोड रात्रीचे वेळी मोटार ट्रक, टेलरचे चालकांना अडवून त्यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम जबरीने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जिवाची पर्वा न करता जखमी होऊनही पाठलाग करून मुंब्रा पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली आहे.               मुंब्रा बायपास रोडवर रोड रात्रीचे वेळी ट्रक, टेलरचे चालकांना अडवून त्यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम जबरीने चोरी करणारे गुन्हेगारांबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलीस वाहनातुन गस्त केल्यास आरोपी हे पोलीस आल्याचे दुरूनच पाहून पळून जातात म्हणून मुंब्रा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी पोलीस निरीक्षक संजय पवार, बाबासाहेब निकम, सहा. पोलीस निरीक्षक अजय कुंभार, सहा.पो.उप निरी.दिपक जाधव, पोलीस अंमलदार अजीज तडवी, सतिश खाबडे, तेजस परब, अर्जुन जुवाटकर, कृष्णा आव्हाड, अब्दुलरौफ खान, रूपेश शेळके यांना वाय जंक्शन ते रेतीबंदर दरम्यान साध्या वेशात रिक्षा, दुचाकी व हायवेवरील कंटेनर मधुन गस्त करून आरोपींना पकडण्याचा सुचना व मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे पोलिसांचे पथक गस्त करीत असतांना मुंबादेवी मंदीराचे पायय्या जवळ तीन इसम हे ट्रक व कंटेनर यांना अडवुन त्यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडुन जबरीने मोबाईल व पैसे काढुन घेत असतांना दिसुन आले. सदर इसमांना पकडण्याचा प्रयत्न करीत असताना दोन इसम पथकास पाहून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दाट लोकवस्तीमध्ये पळून गेले. त्यापैकी एका आरोपी नादिर मोहंमद तारीक सिद्धीकी (वय २५, रा.दत्तवाडी, मुंब्रा) चा पाठलाग करत असताना त्याने त्याचेकडील चॉपर पोलीसांवर उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने जिवाची पर्वा न करता पाठलाग करून शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याला पकडतांना झालेल्या झटापटीत पोशि कृष्णा आव्हाड व अब्दुल रौफ खान जखमी झाले. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने तो गुन्हयाबाबत माहिती देत नव्हता. त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर त्याने त्याचे पळून गेलेले साथीदार करण विजय तेलकर (रा. दत्तवाडी, मुंब्रा) आणि बाबु (पुर्ण नांव पत्ता माहित नाही) यांच्यासोबत मिळून ट्रक किंवा कंटेनर चालकांना लुटल्याची कबुली दिली. 
थोडे नवीन जरा जुने