समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह देखावे अथवा फलक लावून देऊ नयेत यासाठी पोलीस पाटीलांनी सतर्क राहावेत - वपोनि अनिल पाटील
पनवेल दि.०५ (संजय कदम) : आगामी काळात येणारे हनुमान जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, ईस्टर संडे, अक्षय तृतीया, रमजान आदी सणाच्या पार्श्वभूमीवर समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह देखावे अथवा फलक लावून देऊ नयेत यासाठी पोलीस पाटीलांनी सतर्क राहावेत अशी सूचना पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी उपस्थित पोलीस पाटीलांना मार्गदर्शन करताना केले.
शहरातील मंथन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक जगदीश शेजकर, गोपनीय विभागाचे अधिकारी राजेंद्र कुवर, पंकज शिंदे आदींसह पनवेल तालुका हद्दीतील विविध ग्रामपंचायतीचे पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी आगामी सण साजरे करताना लावण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाची परवानगी, समाजात जातीय तेढ निर्माण होणारे आक्षेपार्ह देखावे, ग्रामीण भागातील सोसायटी मध्ये राहणारे भाडेकरू यांची ऑनलाईन नोंदणी, सोशल मीडियावर प्रसारित होणारे आक्षेपार्ह संदेश, उत्सवानिमीत्त मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्शन रांगा तयार करणे, स्वयंसेवक नेमणे तसेच सदर ठिकाणी बंदोबस्ताकरीता असलेले अधिकारी यांना योग्य ते सहकार्य करणे,
ग्रामपंचायत हद्दीमधील महिला, जेष्ठ नागरीक व लहान मुले यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे बसविण्या संदर्भात लोक सहभाग घेण्याबाबत जागृती करणे, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस मदतीकरीता DIAL 112 या क्रमांकावर संपर्क करणे तसेच प्रत्येक गावातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न असल्यास फोन द्वारे किंवा पोलीस पाटील यांच्या ग्रुप वर शेअर करण्याबाबत मागर्दर्शन केले. यावेळी पनवेल तालुका हद्दीतील पोलीस पाटील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags
पनवेल