फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वनाधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये किमतीचे कॅपिझ शंख शेल केले जप्त
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : वन्यजीव संरक्षण कायद्यातील चौथ्या श्रेणीतील असलेल्या कॅपिझ शंख (शेल्स) वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पेण ते पनवेल दरम्यान नाट्यमय पद्धतीने कारवाई करत मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. त्यांची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये किंमत असल्याची माहिती समजते.


            एका गुप्त माहितीच्या आधारे विभागीय वनअधिकारी आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक संजय वाघमोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे (उरण), कुलदीप पाटकर (पेण) आणि ज्ञानेश्वर सोनवणे (पनवेल) यांच्यासह वन अधिकाऱ्यांनी दोन हलक्या व्यावसायिक वाहनांचा पाठलाग केला आणि त्यांना रोखण्यात सफल झाले आहेत. या दोन्ही वाहनांमध्ये शंखांनी (शेल्सने) भरलेल्या गोण्या होत्या. हे रॅकेट दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असू शकते, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून आता असे सामान साठवून ठेवलेल्या गोदामांचा शोध अधिकारी घेत आहेत.थोडे नवीन जरा जुने