शिवाजी नगर झोपडपट्टी ते रेल्वेस्टेशन मार्गावर सी.सी टिव्ही कॅमेरे लावण्याची शिवसेनेकडून मागणी
शिवाजी नगर झोपडपट्टी ते रेल्वेस्टेशन मार्गावर सी.सी टिव्ही कॅमेरे लावण्याची शिवसेनेकडून मागणी 
पनवेल दि.०८ (संजय कदम) : पनवेल शहरातील शिवाजी नगर झोपडपट्टी ते रेल्वेस्टेशन मार्गावर रिक्षा चोरी, गाडया फोडी, पाकीट मारी असे अनेक प्रकारच्या घटना घडत असतात.


 त्यामुळे सामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निमार्ण झालेले आहे. सदर घटना कमी व्हावी, किंवा घडू नये याकामी तसेच गुन्हेगार मिळावेत किंवा पकडले जावेत यासाठी सीसीटिव्ही कॅमेरा बसवावे अशी मागणी शिवसेना पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


               याप्रकरणी तोफिक बागवान यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, शिवाजी नगर झोपडपट्टी येथुन ते रेल्वेस्टेशन रोड पनवेल पर्यंत सामान्य नागरीकांची दिवसभर वर्दळ असते तरी, समाजातील असामाजीक तत्वे देखील वावरत असतात. तसेच रात्री रिक्षा चोरी, गाडया फोडी, पाकीट मारी असे अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. त्या संबंधी बऱ्याचशा तकारी शहर पोलीस स्टेशन पनवेल मध्ये नोंदविण्यात आलेल्या आहेत तरी सामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निमार्ण झालेले आहे. सदर घटना कमी व्हावी, किंवा घडू नये या कामी तसेच गुन्हेगार मिळावेत किंवा पकडले जावेत यासाठी परिसरात सीसीटिव्ही कॅमेरा बसवा अशी मागणी केली आहे.थोडे नवीन जरा जुने