पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत टँकर पलटी







पनवेल दि.०८ (संजय कदम) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत अचानक टँकर पलटी झाल्याने महामार्ग काही काळ ठप्प झाला होता. या घटनेत टँकरचालक किरकोळ जखमी झाला असून पनवेल तालुका पोलीस आणि पळस्पे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महामार्ग वरील वाहतूक सुरळीत केली.




        मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते पेण बाजूकडे जात असताना कर्नाळा खिंडीत टँकरचालक अनुराग रामजी यादव यांचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने डाव्या बाजूला पलटी झाला. या घटनेत टँकरचालक किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस आणि पळस्पे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महामार्ग वरील वाहतूक सुरळीत केली. तसेच आपत्कालीन मोबाईल ऍम्ब्युलन्स तात्काळ दाखल होत टँकरचालकाला प्राथमिक उपचार करत त्याला रुग्नालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.



थोडे नवीन जरा जुने